Published On : Tue, May 15th, 2018

एमबीबीएस विद्यार्थिनीशी अश्लिल चाळे

Crime

नागपूर: झोपेत असलेल्या एमबीबीएस विद्यार्थिनीशी अश्लिल चाळे करणाºया आंबट शौकीन प्रवाशाची चांगलीच धुलाई करण्यात आली. हा प्रकार १८०३० शालीमार एक्स्प्रेसमध्ये बोरखेडी जवळ घडला. चिंतामन दत्ताजी रणदेवे (२८, रा. गोळेगाव, त. नांदगाव, अमरावती) असे त्या प्रवाशाचे नाव आहे. याघटनेवरुन महिलांच्या सुरक्षेसाठी पथक वाढविण्याची गरज आहे.

Advertisement
Advertisement

पीडित विद्यार्थिनी एमबीबीएसला शिकते. कामानिमीत्त ती मुंबईला जात होती. एस-४ बोगीतील आरक्षित बर्थवर झोपली असताना आरोपीने विद्यार्थिनीजवळ जाऊन अश्लिल चाळे केले. ती मोठ्याने ओरडली तसेच त्याची कॉलर पकडून गालावर प्रसाद दिला. घटनेची गंभीरता लक्षात घेता बोगीतील प्रवाशांनीही त्याला बेदम मारले.

Advertisement

याघटनेची माहिती टीसीला देण्यात आली. टीसीने पोलिसांना कळविले. बडनेरा रेल्वे स्थानकावर उतरवून त्याला लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन नागपूर लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. आरोपीची कारागृहात रवानगी करण्यात आली. चिंतामन हा कुठल्यातरी कामानिमीत्त नागपुरात आला होता. गावाला जात असतानाच एकट्या विद्यार्थिनीला पाहून त्याच्या मनात वाईट विचार आले. या घटनेमुळे रेल्वेत महिला, तरुणी आणि विद्यार्थिनींचीही सुरक्षा धोक्यात आल्याचे दिसते.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement