Published On : Mon, Jun 18th, 2018

महापौर नंदा जिचकार आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी संयुक्त केली स्मार्ट सिटीच्या नगररचना परियोजनाची पाहणी

Advertisement

नागपूर: नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या एरिया बेस्ड डेव्हलपमेंट अंतर्गत पुनापूर, भरतवाडा, पारडी येथे तयार करण्यात आलेल्या नगररचना परियोजनेची पाहणी महापौर नंदा जिचकार यांनी शुक्रवारी (ता.१५) सकाळी केली.

यावेळी त्यांच्यासमवेत आयुक्त वीरेंद्र सिंह, नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रामनाथ सोनवणे, उपअभियंता राजेश दुफारे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी पारडी येथील शीतला माता मंदिराजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीपासून पाहणी दौ-याला सुरवात केली. त्यानंतर भरतवाडा रोड, पुनापूर, भवानी माता मंदिर परिसरासमोरिल रस्ते, भंडारा रोडवरील रस्ते याची पाहणी मान्यवरांनी केली. सदर प्रकल्पाचा मंजूर नकाशा यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रामनाथ सोनवणे यांनी महापौर आणि आयुक्त यांच्या समक्ष सादर केला. कामाला लवकरात लवकर चालना मिळावी यासाठी प्रयत्नरत राहवे, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

यावेळी महापौरांनी आणि आयुक्तांनी स्मार्ट सिटीच्या नगररचना परियोजना समजून घेतली. स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. नगररचना परियोजना (टीपीएस)विषयी असलेल्या नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या.