Published On : Sun, Apr 5th, 2020

महापौर संदीप जोशी यांनी दिवे लावून दिला एकतेचा संदेश

नागपूर: कोरोनाविरुद्ध लढताना या लढ्यात जे योद्धा म्हणून भूमिका बजावत आहे त्यांचे मनोबल वाढण्यासाठी आणि प्रत्येक व्यक्ती प्रत्येकासोबत आहे याची जाणीव करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी सहकुटुंब दीप प्रज्वलित करून एकतेचा संदेश दिला.

कोरोना विषाणू विरुद्ध नागपूरकर एकत्रित येऊन लढा देत आहेत. संपूर्ण यंत्रणा कोरोनाची साखळी तोडण्यासाठी एकजूट झाली आहे. लॉकडाऊनला प्रतिसाद देत नागरिकही तेवढ्याच जिकरीने लढत आहेत. यादरम्यान जे गरीब व्यक्ती आहेत, मजूर वर्ग आहे, त्यांची काळजी यंत्रणेसोबत अनेक समाजसेवी संस्था, अनेक व्यक्ती घेत आहेत. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांचीही काळजी त्यांना चहा, नाश्ता देत अनेक संस्था घेत आहेत. या सर्व लढाईत नागपूरकर संपूर्ण ताकदीने एकत्रित आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज नागपूरकरांनी दिवे लावून आसमंत उजळला. याबददल सर्व नागपूकरांचे आभार मानतो, या शब्दात महापौर संदीप जोशी यांनी दीपपर्वावर आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी स्वगृही सहकुटुंब दिवे लावून प्रकाशपर्वात सहभाग घेतला.