Published On : Mon, Dec 30th, 2019

म्हैसूर शहराचे महापौर, उपमहापौर, जिल्हाधिकारी, आयुक्तांची नागपूर शहराला भेट

Advertisement

महापौर संदीप जोशी यांनी केले स्वागत : भांडेवाडी येथील ‘बायो रिमेडीएशन’ प्रकल्पाची केली पाहणी’

.

नागपूर : कर्नाटकमधील म्हैसूर शहराच्या महापौर पुष्पलता जगन्नाथ, उपमहापौर शफी अहमद, जिल्हाधिकारी अभिराम जी.शंकर, आयुक्त गुरूदत्त हेगडे यांनी सोमवारी (ता.३०) अभ्यास दौ-यांतर्गत नागपूर शहराला भेट दिली. महापौर कक्षामध्ये महापौर संदीप जोशी यांनी सर्व मान्यवरांसह शिष्टमंडळाचे तुळशी रोप देउन स्वागत केले व शहरातील प्रकल्पांसंदर्भात चर्चा केली. याशिवाय आयुक्त कक्षामध्ये आयुक्त अभिजीत बांगर यांनीही सर्व मान्यवरांशी संवाद साधला.

Gold Rate
26 May 2025
Gold 24 KT 95,800/-
Gold 22 KT 89,100/-
Silver/Kg 98,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शिष्टमंडळामध्ये म्हैसूरचे महापौर, उपमहापौर, जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्यासह म्हैसूर महापालिकेच्या वित्त समिती अध्यक्ष श्रीमती शोभा, आरोग्य अधिकारी डॉ.जयनाथ एम.एस., अरोग्या अधिकारी डॉ.डी.जी. नागराज यांचा समावेश होता.

अभ्यास दौ-यादरम्यान मान्यवरांनी भांडेवाडी येथे सुरू असलेल्या ‘बायो रिमेडीएशन’ प्रकल्पाची पाहणी केली. प्रकल्पासंदर्भात मनपा उपअभियंता राजेश दुफारे यांनी सादरीकरण केले. झिग्मा ग्लोबल एनव्हान्स सोल्यूशन प्रा.लि.चे संचालक नागेश प्रभू यांनी प्रकल्पाची माहिती दिली.

भांडेवाडी येथे नागपूर महानगरपालिकेतर्फे ५३ एकरमध्ये प्रकल्प राबविण्यात येत आहे. भांडेवाडीतील कच-यावर प्रक्रिया करणारा हा प्रकल्प असून या कच-यामधून काच, लोखंड, टायर आदींवर पुनर्प्रक्रिया केली जाते तर माती व दगड वेगळे केले जाते. इतर कच-यावर प्रक्रिया करून तो कचरा आरडीएफ या सीमेंट कंपनीला देण्यात येतो. संपूर्ण प्रकल्पापैकी आतापर्यंत तीन एकरमधील कच-यावर प्रक्रिया करण्याचे काम झाले असल्याची माहिती झिग्मा ग्लोबल एनव्हान्स सोल्यूशन प्रा.लि.चे संचालक नागेश प्रभू यांनी यावेळी दिली.

म्हैसूर शहराची लोकसंख्या सुमारे १० लाख असून महापालिकेमध्ये ६५ नगरसेवक प्रतिनिधीत्व करतात. शहरातील सुमारे २ लाख टन कचरा १७ ते २० एकरांमध्ये आहे. स्वच्छ सर्व्हेक्षणमध्ये म्हैसूर शहर तिस-या क्रमांकावर असून कच-याचे व्यवस्थापन आणि प्रक्रिया यासंदर्भात वेगवेगळ्या शहरांमध्ये अभ्यास दौरा करण्यात आला. नागपूर शहरात राबविण्यात येत असलेला ‘बायो रिमेडीएशन’ प्रकल्प इतर शहरातील प्रकल्पांपेक्षा उत्तम आहे. या प्रकल्पाची म्हैसूर शहरात अंमलबजावणी व्हावी यासाठी कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी म्हैसूर महापालिकेचे आयुक्त गुरूदत्त हेगडे यांनी दिली. प्रकल्पाशी संबंधीत प्रशासकीय व कायदेशीर बाबींसंदर्भातही मान्यवरांनी चर्चा केली.

Advertisement
Advertisement
Advertisement