Published On : Thu, May 14th, 2026
By Nagpur Today Nagpur News

महापौर निता ठाकरे यांनी केली अंबाझरी तलावाची पाहणी

अधिक मशिनरीचा वापर करून तलावाला जलपर्णीच्या विळख्यातून बाहेर करण्याचे दिले निर्देश
Advertisement

नागपूर: शहरातील ऐतिहासिक अंबाझरी तलावाला पडलेला जलपर्णीचा विळखा आणि तेथील सद्यस्थितीची पाहणी करण्यासाठी महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी गुरुवारी(ता.१४) सकाळी अंबाझरी तलाव परिसराचा दौरा करीत पाहणी केली. तलावातील जलपर्णीमुळे होणारे जल प्रदूषण आणि नैसर्गिक हानी टाळण्यासाठी महापौर श्रीमती ठाकरे यांनी प्रशासनाला अधिक प्रमाणात मशिनरी लावून स्वच्छता मोहीम अधिक तीव्र करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. महापौरांनी पावसाळ्यापूर्व जलपर्णी काढण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश ही दिले.

यापाहणी दौऱ्याप्रसंगी उपमहापौर श्रीमती लिला हातीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे आणि मनपा आयुक्त डॉ. विपीन प्रामुख्याने उपस्थित होते. महापौरांनी जलपर्णी काढण्याच्या कामाचा आढावा घेऊन कामात गती आणण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. सध्या तलावाच्या सुमारे ७ ते ८ एकर परिसरातील जलपर्णी काढण्यात यश आले असून, उर्वरित भागासाठी कामाचा वेग वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याकरिता ४ पोकलेन, १ जे सी बी आणि तीन टिप्पर सध्याची परिस्थितीत कार्यरत आहे.

आयुक्त डॉ. विपीन यांनी तलावात कार्यरत पोकलेनची संख्या वाढवून सहा करण्याचे निर्देश दिले. तसेच तिथे निघालेली जलपर्णी ला दुसरीकडे नेण्याचे निर्देशीत केले. त्यांनी सांगितले की, वाडी नगर परिषद चे सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांटचे काम यावर्षी पूर्ण होणार असून, त्यामधून येणाऱ्या सांड पाणी स्वच्छ होऊन अंबाझरी तलावात येईल. तसेच जलपर्णी काढण्यासाठी मोठी मशीन सुद्धा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मनपातर्फे अंबाझरी मध्ये येणाऱ्या सांड पाणीला थांविण्यासाठी एक मुरुमाचा तात्पुरता बंधारा तयार करण्यात आला असून, यामुळे जलपर्णीच्या विळखा कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

यावेळी स्थानिक नगरसेवक श्री. योगेश पाचपोर, श्री. विजय होले, श्रीमती वर्षा चौधरी, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, सहायक आयुक्त श्री. राजकुमार मेश्राम, कार्यकारी अभियंता श्री. राजेश दुफारे, कार्यकारी अभियंता श्री. मनोज गद्रे, घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र महल्ले आणि झोनल स्वच्छता अधिकारी श्री. लोकेश वासनवार यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.