Published On : Tue, Mar 17th, 2026
By Nagpur Today Nagpur News

महापौर निता ठाकरे यांच्यासह नगरसेवकांनी घेतली आगग्रस्तांची भेट

यशवंत स्टेडियम जवळील उदासी आश्रम जवळील चार झोपड्या जळून खाक
Advertisement

नागपूर, : यशवंत स्टेडीयमजवळील उदासी आश्रमाला लागून असलेल्या झोपडपट्टीमध्ये सोमवारी (ता. 16) सकाळी आग लागून चार झोपड्या जळून खाक झाल्या. महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्यासह प्रभाग क्रमांक १५ च्या नगरसेवकांनी आगग्रस्त कुटुंबियांची भेट घेतली. नागपूर महानगरपालिका व राज्य सरकारतर्फे सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले व जख्मींची विचारपूस केली.

यशवंत स्टेडीयमच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीतील आगग्रस्तांची महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी नगरसेवक श्री. विनय दाणी, नगरसेवक श्री. सुनील हिरणवार, नगरसेविका श्रीमती पूजा पाठक, नगरसेविका श्रीमती धनश्री देशपांडे, सहाय्यक आयुक्त श्री. राजकुमार मेश्राम उपस्थित होते. या आगग्रस्तांना निवारा व तात्पुरत्या उदरनिर्वाहाची सोय करण्यासाठी राज्य सरकारने त्वरित मदत द्यावी, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने पाठपुरावा करावा, असे निर्देश महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

Gold Rate
July 30 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 43,100 /-
Gold 22 KT ₹ 1,32,800 /-
Silver/Kg ₹ 2,18,100/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी या आगीत झोपड्या जळालेल्या कुटुंबियांकडून आगीचे कारण जाणून घेतले व या आगीत जखमी झालेल्यांची विचारपूस केली. आगग्रस्त श्रीमती बसंती ठाकूर, श्री. योगेश ठाकूर, श्री. राजेंद्र सिंग सड्डल व श्री. सुरेश ठाकूर यांच्या कुटुंबातील सदस्यांची महापौरांनी भेट घेतली. या आगीत चार झोपड्या पूर्णपणे जळालेल्या आहेत.

या कुटुंबातील सदस्यांची तात्पुरती निवार्याची सोय करण्याची आवश्यकता आहे. यासाठी राज्य सरकारकडून तात्काळ मदतीसाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन महापौरांनी आगग्रस्तांना दिले. नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांना या संदर्भात माहिती दिली जाईल व आगग्रस्तांना तात्काळ मदत देण्यासाठी प्रशासन स्तरावरून प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन महापौरांनी यावेळी दिले.

Advertisement
Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

निर्मल उज्ज्वल के प्रमोटर के घर पहुंचे जमाकर्ता | "हमारा पैसा वापस करो" | Nagpur News | Viral Video

निर्मल उज्ज्वल के प्रमोटर के घर पहुंचे जमाकर्ता | "हमारा पैसा वापस...

NagpurCrime : नागपुर में काली बाइक गैंग का आतंक; एक दिन में 3 जगह वारदात #Nagpur #NagpurNews #Crime

NagpurCrime : नागपुर में काली बाइक गैंग का आतंक; एक दिन में...

Amravati: दर्यापुर के ज्वेलर्स में हथियारबंद डकैती #Amravati #jewellery  #Robbery #Crime #Robbery

Amravati: दर्यापुर के ज्वेलर्स में हथियारबंद डकैती #Amravati #jewellery #Robbery #Crime #Robbery

Nagpur: Cotton Market की सद्गुरु सेल्स में भीषण आग #Nagpur #NagpurNews #FireAccident #FireBrigade

Nagpur: Cotton Market की सद्गुरु सेल्स में भीषण आग #Nagpur #NagpurNews #FireAccident...

Nagpur: हिस्ट्रीशीटर पुलिस कस्टडी से फरार #Nagpur #NagpurNews  #HistorySheeter #PoliceCustody #Crime

Nagpur: हिस्ट्रीशीटर पुलिस कस्टडी से फरार #Nagpur #NagpurNews #HistorySheeter #PoliceCustody #Crime

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges