Published On : Tue, Mar 17th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात खळबळ; बारावीच्या विद्यार्थ्याचा एम्प्रेस मॉलमध्ये सापडला मृतदेह

Advertisement

नागपूर : शहरातील गांधीसागर तलावाजवळील इंप्रेस मॉल परिसरात बारावीतील एका विद्यार्थ्याने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून मृत विद्यार्थ्याची ओळख मानेवाडा येथील जवाहरनगर परिसरातील यश सुनील झाडे (१८) अशी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यश हा बारावीचा विद्यार्थी होता. त्याची परीक्षा ११ मार्चलाच संपली होती. मात्र त्यानंतरही तो घरच्यांना “पेपर सुरू आहेत” असे सांगून दररोज घरातून बाहेर पडत होता. त्यामुळे कुटुंबीयांना कोणतीही शंका आली नव्हती.

Gold Rate
Sept 24,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,900 /-
Gold 22 KT ₹ 1,40,900 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शनिवारी सकाळीही तो नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडला. काही वेळाने परत घरी आला. दुपारी सुमारे दोनच्या सुमारास “खेळायला जातो” असे सांगून तो पुन्हा घराबाहेर पडला; मात्र त्यानंतर तो परतलाच नाही. रात्री उशिरापर्यंत यश घरी न आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. त्याच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता फोन लागत नव्हता. अखेर नातेवाईकांनी हुडकेश्वर पोलिस स्टेशन येथे त्याच्या बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.

दरम्यान, गांधीसागर तलावाजवळील इंप्रेस मॉल परिसरात चौथ्या मजल्यावरून एका युवकाने उडी मारल्याचे सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आले. रक्षकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत युवकाचा मृत्यू झाला होता.

Advertisement

तपासादरम्यान मृतदेहाची ओळख यश सुनील झाडे अशी पटली. या घटनेने परिसरात आणि कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.