Published On : Sun, May 23rd, 2021

‘वंदे मातरम् जन आरोग्य केंद्रा’साठी महापौरांनी केली धरमपेठ झोनमधील 10 जागांची पाहणी

Advertisement

नागपूर: स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापनदिनी नागपूर शहरात 75 ‘वंदे मातरम् जन आरोग्य केंद्र’ स्थापित करण्याची महापौर श्री दयाशंकर तिवारी यांनी घोषणा केली होती. त्या अनुषंगाने महापौरांनी धरमपेठ झोन येथील प्रस्तावित 10 जागांची पाहणी केली.

यावेळी महापौरांसोबत आरोग्य समिती सभापती महेश महाजन, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक सर्वश्री विक्रम ग्वालबंशी, अमर बागडे़, नगरसेविका सौ दर्शनी धवड, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार , डॉ. विजय जोशी, उपअभियंता श्रीकांत देशपांडे उपस्थित होते.

Gold Rate
Apr 09,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,52,100 /-
Gold 22 KT ₹ 1,41,500 /-
Silver/Kg ₹ 2,45,100/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

‘वंदे मातरम् जन आरोग्य केंद्रा’चे संचालन स्वयंसेवी संस्थांच्या मध्यमाने केले जाईल. धरमपेठ झोन मधील या जागांबद्दल नगरसेवकांनी सूचना केली होती. महापौर श्री दयाशंकर तिवारी यांनी मनपा प्रशासनाला आरोग्य केंद्र स्थापन करण्याकरिता प्राकलन तयार करने तसेच विद्युत कनेक्शन घेण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही दिले.

महापौरांनी दाभा चुंगी नाका, भिवसनखोरी समाज भवन, हजारीपहाड़ विवेकानंद सभागृह, पांढराबोड़ी काली माता मंदिर, काछीपुरा गोंड मोहल्ला, गिरीपेठ गवळीपुरा समाज भवन, पंचशील नगर समाज भवन, बोरगांव बर्डे ले-आउट समाज भवन, लाडे विद्यालय मोहन नगर, प्रकाश नगर गिरहे लेआउट च्या जवळील मैदान, श्री आदर्शनीय हाउसिंग सोसायटी गिरहे लेआउट या भागाचा दौरा केला. त्यांनी दाभामधे 50 बेड्स चे रुग्णालय निर्माण करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही दिले. ही जागा रुग्णालयासाठी आरक्षित आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement