Published On : Sun, May 23rd, 2021

वृत्तपत्र हॉकर्स आणि वितरकांची कोरोना चाचणी नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर यांचा पुढाकार

नागपूर: लकडगंज झोन अंतर्गत प्रभाग २३ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सेंट्रल एव्हेन्यू रोड येथे स्थानिक नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्या विशेष पुढाकाराने परिसरातील वृत्तपत्र हॉकर्स आणि वितरकांची कोरोना चाचणी करण्यात आली.
लकडगंज झोनच्या सहायक आयुक्त साधना पाटील यांच्या नेतृत्वात झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रश्मी बैसवारे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य चमूने ७१ वृत्तपत्र वितरक आणि हॉकर्सची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.

नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्या पुढाकाराने रविवारी (ता.२३) सकाळी ४.३० ते सकाळी ७.३० वाजतापर्यंत हे कोव्हिड चाचणी अभियान राबविण्यात आले.