नागपूर: नागपूर महानगरपालिकेतील सामान्य प्रशासन विभागात कार्यरत कर्मचारी किशोर तिडके यांचा मुलगा आदित्य याची आयआयटी रुडकी येथे निवड झाल्याबद्दल महापौर नंदा जिचकार यांनी मनपा मुख्यालयातील महापौर कक्षात पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार केला.
यावेळी ज्येष्ठ नगरसेवक संजय बंगाले, नगरसेवक कमलेश चौधरी, आदित्यची आई कुंदा तिडके यावेळी प्रामुख्याने उपस्थित होत्या.
आयआयटीमध्ये निवड होणे सोपे नाही. मात्र जिद्दीच्या भरोशावर आणि आई-वडिलांच्या मार्गदर्शनामुळे आदित्य हे साध्य करू शकला. त्याची निवड ही नागपूरसाठी गौरवाची बाब आहे, असे म्हणत महापौर नंदा जिचकार यांनी त्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आदित्यचे वडील किशोर आणि आई कुंदा तिडके यांचेही अभिनंदन केले.
सामान्य प्रशासन विभागाद्वारे आदित्य तिडके याचा सत्कार करण्यात आला. यावेळी सामान्य प्रशासन विभागातील डोमाजी भडंग, विनय नानवटकर, श्री.बारई, मनोज मिश्रा, दिलीप चौधरी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.