Published On : Fri, Jul 3rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

मेयो लाच प्रकरण; डॉ. नंदकिशोर जयस्वाल स्टेनोची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Advertisement

नागपूर: इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथील बहुचर्चित लाचखोरी प्रकरणातील अटक करण्यात आलेले शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. नंदकिशोर कमलनारायण जायसवाल आणि त्यांचा स्टेनो यांना न्यायालयाकडून तातडीचा दिलासा मिळाला नाही. दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर जिल्हा न्यायालयाने दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावून नागपूर मध्यवर्ती कारागृहात पाठविण्याचे आदेश दिले.

जिल्हा न्यायाधीश ग्वालानी यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हा आदेश दिला. आरोपींकडून जामीन अर्जही दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यावर शुक्रवारी सुनावणी होऊ न शकल्याने दोघांनाही सध्या कारागृहातच राहावे लागणार आहे.

सरकारतर्फे मुख्य जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी न्यायालयात तपासाची प्रगती आणि उपलब्ध पुरावे सादर केले. तर आरोपींची बाजू अॅड. मिलिंद तोतरे यांनी मांडली.

वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र देण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप-
भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (एसीबी) वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र देण्यासाठी कथितरित्या लाच मागितल्याच्या आरोपावरून डॉ. जायसवाल आणि त्यांच्या स्टेनोला अटक केली होती. तक्रारदाराच्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांचीही चौकशी-
पोलीस कोठडीदरम्यान एसीबीने आरोपींची सखोल चौकशी केली असून त्यांच्या बँक खात्यांची, बँक लॉकरची, चल-अचल मालमत्तेची तसेच इतर गुंतवणुकीची माहिती तपासण्यास सुरुवात केली आहे. कथित भ्रष्टाचारातून मिळालेला पैसा नेमका कुठे गुंतवण्यात आला आणि या प्रकरणात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.

या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, पुढील चौकशीत आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता एसीबीने व्यक्त केली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.