Published On : Fri, Jun 21st, 2019

मौद्यात आज नि:शुल्क आरोगय शिबिर

श्री श्री फाऊंडेशन कोराडी तर्फे उद्या दिनांक 22 रोजी मौदा येथिल राधाकृष्ण मंगल कार्यालयात नि:शुल्क आरोग्य शिबिराच आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
शिबिराचे उद्घाटन राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होईल.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष निशाताई सावरकर उपस्थित राहणार. या शि‍बिरात सर्व प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या, इसीजी, मधुमेह तपासणी, मेमोग्रफी, पीएफटी, दंत तपासणी, डोळ्यांची तपासणी, किडणी, हडांच्या रोगाची तपासणी, पोटाचे विकार आदी तपासण्या नि:शुल्क केल्या जाणार आहे.

या शिबिरात मेडिकल कॉलेज नागपूर, जिओ हॉस्पिटल नागपूर येथील शासकीय डॉक्टरांची चमू तसेच काही खाजगी डॉक्टरांची चमूही उपस्थित राहून आपल्या सेवा देणार आहेत. विविध रोगांचे विषेशतज्ञ उपस्थित राहून रूग्णांना सल्ला देतील.

नागरिकांनी या शिबिराला उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन श्री श्री फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष संकेत बावनकुळे यांनी केले आहे.