Published On : Fri, Jul 26th, 2019

मौदा एनटीपीसीमध्ये मजुराचा दबून मृत्यू

Advertisement

नागपूर: तारसा येथे असलेल्या एनटीपीसी प्रकल्पात शुक्रवारी पहाटे ५.०० वाजता रात्रीपाळीला असलेल्या अजय केशव मोटघरे (२१) आजनगाव याचा मशीन मध्ये दबून जागीच मृत्यू झाला.

रात्री १० वाजता अजयने हजेरी लावली. एम जी आर विभागात काम करीत असताना साईड आर्म चार्ज मागे आली. अजय तिथे उभा होता मागे कोळशाचा मोठा डब्बा असल्यामुळे अजय मधोमध सापडल्यामुळे तो जागीच गतप्राण झाला. येथील अलार्म काही दिवसापासून बंद असल्यामुळे आवाज आला नाही.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यामुळे सूचना न मिळाल्याने अजयचा मृत्यू झाला अशी चर्चा आहे. ह्या मशीनमध्ये तीन दिवसापासून बिघाड असल्यामुळे अलार्म वाजला नाही. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपनामुळे त्याचा हकनाक प्राण गेला असे बोलले जात होते. अजय हा धामणगावचा रहिवासी होता. तो एमजीआर विभागात कार्यरत होता.

या घटनेनंतर शेकडो कामगारांनी व्यवस्थापकांच्या बंगल्याला घेराव घातला व दगडफेक केली. अजयच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये व एकाला नोकरी अशी मागणी केली. यावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात दोनजण जखमी झाले. यापैकी मंगेश ठाकरे हा गंभीर जखमी आहे.

Advertisement
Advertisement