Published On : Tue, Mar 28th, 2017

उद्धव ठाकरे मुक्काम हलवणार? ‘मातोश्री 2’चे बांधकाम सुरू

Matoshree-2
मुंबई:
शिवसेना पक्षप्रमुख आणि दै. सामनाचे संपादक उद्धव ठाकरे हे येत्या काही काळात आपला ‘मातोश्री’वरचा मुक्काम हालवणार असल्याचे समजते. ठाकरे यांचे सध्याचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’जवळच ‘मातोश्री 2’चे बांधकाम सुरू आहे. वांद्रे पूर्व परिसरातील कलानगर भागात हा नविन प्लॉट असल्याची माहिती आहे.

इंग्रजी वृत्तपत्र ‘मुंबई मिरर’च्या हवाल्याने एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘मातोश्री 2’ ही सहामजली भव्य इमारत असून, ट्रिप्लेक्स अपार्टमेंट असणार आहे. ‘मातोश्री 2’चे बांधकाम सुरू असलेली जागा गेल्याच वर्षी म्हणजे ऑक्टबर 2016 मध्ये ठाकरे कुटूंबियांनी खरेदी केल्याची रिअल इस्टेट क्षेत्रातील सुत्रांची माहिती आहे. ही इमारत अतिशय आलीशान असून, ती तब्बल 10 हजार स्वेअर फुटाच्या जागेवर बांधण्यात येत आहे. प्रत्येक बेडरूममध्ये पाच बेडरूम, एक स्टडी रूम अशी या इमारतीची रचना असले. प्रसिद्ध वास्तूविशारद कंपनी तलाटी एण्ड पंथकी या इमारतीचे बांधकाम करणार आहे.

ही जागा मुळची कोणाची?
प्राप्त माहितीनुसार महान कलाकार के के हेब्बार या ठिकाणी वास्तव्यास होते. दरम्यान, 1996 मध्ये त्यांचे निधन झाले. पूढे हेब्बार यांच्या पत्नी सुशाला यांनी या जागेचा ताबा मिळवला. मात्र, सुशीला यांच्या मुलांनी 2007मध्ये ही जाका प्लॅटिनम इंफ्रास्ट्रक्चरला 3.5 कोटी रूपयांना विकली. पूढे या ठिकाणी नव्या प्रोजेक्टची उभारणी करण्यासाठी प्लॅटीनमने हेब्बार कुटूंबियांचा मुळचा बंगला पाडला. मूळ बंगला दुमजली होता. दरम्यानच्या काळात ही जागा विक्रीसाठी प्लॅटीनमला काही अटींवर मंजूरी मिळाली.

ठाकरे कुटूंबियांनी किती रूपयांना विकत घेतली जागा?
दरम्यान, प्लॅटीनमला ही जागा विकण्याची परवानगी मिळाली खरी. पण, विक्रीतून येणाऱ्या एकूण किमतीपैकी 50 टक्के रक्कम ही राज्य सरकारला देण्यात यावी अशी प्रमुख अट होती. दरम्यान, ही सर्व प्रक्रिया पूर्ण होताच ठाकरे कुटूंबियांनी ही जमीन खरेदीसाठी प्रयत्न सुरू केले. तसेच, अधिग्रहण आणि पुनर्विकासासाठी कलानगर सहकारी सोसायटीचं नाहरकत प्रमाणपत्र मिळवले. हे प्रमाणपत्र मिळता ठाकरे कुटूंबियांना 24 सप्टेंबर 2016 रोजी नाहरकत प्रमाणपत्र मिळालं, त्यानंतर एका महिन्यात म्हणजे ऑक्टोबर 2016 मध्ये ठाकरे कुटुंबियांनी ही जागा 11.60 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली. जागेची खरेदी करताना ठाकरे कुटुंबियांनी 5.8 कोटी रुपये प्लॅटिनमला दिले, तर उर्वरित 5.8 कोटी रुपये जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केले. शिवाय स्टॅम्प ड्युटीचे 58 लाख रुपयेही ठाकरे कुटुंबियांनीच दिले. 17 ऑक्टोबर 2016 रोजी मुंबई महापालिकेने ठाकरे कुटुंबियांनी बांधकामाची परवानगी दिल्याचे मिररने म्हटले आहे.