Published On : Tue, Mar 28th, 2017

IAS-IPS अधिकाऱ्यांचा मुलांचा बारबालांसोबत “नंगानाच”


इगतपुरी:
नाशिकच्या इगतपुरीत अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. मिस्टी व्हॅलीत उच्चभ्रू परिवारातील मुलांचा धिंगाणा घातला आहे. आणि प्रकरणात १० बार गर्लसह अर्धनग्न अवस्थेत धिंगाणा घालणाऱ्या १३ मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक माहिती म्हणजे यामध्ये अनेक IAS आणि IPS अधिकाऱ्यांचा मुलांचा समावेश आहे. त्याचा त्रास होत असल्याने शेजारी रहाणा-या नागरीकांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी कारवाई करुन या मुलांना अटक केली.

ड्रग, अल्कोहोलचं सेवन केल्यामुळे १३ तरुण-तरुणींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यांना तातडीने जामीनही देण्यात आला. रविवारी मध्यरात्रीची ही घटना आहे. पुणे, ठाणे, औरंगाबाद, नंदुरबार येथील आयएएस, आयपीएस आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेजाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.

पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. महत्वाचं म्हणजे अटक केल्यानंतर या मुलांची लगेच जामिनावरही सुटका झाली. सुटकेसाठी पोलिसांवर दबाव टाकल्याची माहिती आहे. पुणे, ठाणे, औरंगाबाद, नंदूरबार येथील बडया सरकारी अधिका-यांची ही मुले असल्याची माहिती आहे.