Published On : Fri, Aug 2nd, 2019

रविवार ला जुनीकामठी येथे भव्य कावड यात्रा

कन्हान : – पवित्र श्रावन महिन्या च्या पावन पर्वावर शिवमंदिर देव स्थान समिती जुनीकामठी व्दारे भव्य कावड यात्रेसह शिवशंकर शोभायात्रा काढुन कन्हान (कर्णिका), कोलार व पेंच नदीच्या त्रिवेणी संगमवार महाआरती व शिव महाजलाभिषेकांचे आयोजन करण्यात आले आहे .

रविवार (दि.४) ऑगस्ट ला पवित्र श्रावन महिन्या च्या पावन पर्वावर दरवर्षी प्रमाणे शिवमंदिर देव स्थान समिती जुनीकामठी व्दारे सकाळी १०. ३० वाजता गणेश मंदीर गोराबाजार येथे येरखडा, जुना गोदाम, जुनीकामठी येथील सर्व कावड धारी एकत्र येऊन भव्य कावड यात्रा भगवान शिवशंकर च्या भव्य शोभायात्रा काढुन मुख्य मार्गाने भ्रमण करित

कन्हान (कर्णिका), कोलार व पेंच नदीच्या त्रिवेणी संगमवार पोहचुन गंगेची महाआरती करून कावड मध्ये पवित्र जल घेऊन शिव मंदीर जुनीकामठी येथे १२ वाजता भगवान शिवशंकराचे महाजलाभिषेक व विधिवत पुजा अर्चना करून दुपारी १ वाजता महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे. करिता परिसरातील भाविकांनी या भव्य कावड यात्रेत सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवमंदिर देव स्थान समिती जुनीकामठी व्दारे करण्यात आले आहे.