Published On : Mon, Mar 23rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरच्या भांडेवाडी-बीडगाव परिसरात भीषण आग; ८ गोदाम जळून खाक!

४ तासांच्या प्रयत्नांनंतर आटोक्यात!
Advertisement

नागपूर : शहरातील भांडेवाडी-बीडगाव परिसरात सोमवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीने मोठे नुकसान झाले असून एका फर्निचर कारखान्यासह जवळपास ८ गोदामे जळून खाक झाली आहेत. सुमारे चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळच्या सुमारास भांडेवाडी-बीडगाव येथील एका फर्निचर तयार करणाऱ्या कारखान्यात अचानक आग लागली. आग वेगाने पसरत गेल्याने शेजारील गोदामांनाही तिने वेढा घातला. या गोदामांमध्ये ठेवलेला लाखो रुपयांचा माल पूर्णपणे जळून नष्ट झाला.

Gold Rate
Mar 232026 - Time 10.20Hrs
Gold 24 KT ₹ 1,40,300 /-
Gold 22 KT ₹ 1,30,500 /-
Silver/Kg ₹ 2,16,800/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

घटनेची माहिती मिळताच शहरातील विविध अग्निशमन केंद्रांमधून एकूण ९ दमकल गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीची तीव्रता लक्षात घेता अतिरिक्त मदतही बोलावण्यात आली. दरम्यान, गोदामांमध्ये ठेवलेले सुमारे तीन सिलेंडर स्फोट झाल्याने आग अधिक भडकली आणि परिस्थिती आणखी गंभीर झाली.

अखेर जवळपास चार तासांच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. या भीषण घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत पुढील तपास सुरू आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement