Published On : Fri, May 15th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या गांधीबागातील कपड्यांच्या दुकानाला भीषण आग; युनियन बँकेचे एटीएम बचावले

Advertisement

नागपूर : शहरातील गजबजलेल्या गांधीबाग परिसरातील नंगा पुतळा चौक येथे शुक्रवारी सकाळी भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. बेसमेंटमध्ये असलेल्या कपड्यांच्या दुकानातून आग लागल्याची माहिती असून काही क्षणांतच संपूर्ण परिसर धुराने व्यापला गेला. ही घटना सकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास घडली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आग वेगाने पसरत दुकानाबाहेर ठेवलेले बूट-चप्पलांचे पोते आणि मालाचे गठ्ठेही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. धुराचे मोठे लोट आणि आगीच्या ज्वाळा पाहून परिसरातील व्यापारी व नागरिकांमध्ये घबराट पसरली. नागरिकांनी तातडीने अग्निशमन विभागाला माहिती दिली.

Gold Rate
Aug 25 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 62,100 /-
Gold 22 KT ₹ 1,50,400 /-
Silver/Kg ₹ 2,42,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

माहिती मिळताच गंजीपेठ अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. विशेष म्हणजे, दुकानाच्या वर असलेले शोरूम तसेच शेजारील युनियन बँक ऑफ इंडियाचे एटीएम आगीपासून थोडक्यात बचावले. वेळेत आग आटोक्यात आली नसती तर मोठे नुकसान होण्याची शक्यता होती.

प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेनंतर परिसरात बराच वेळ गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Advertisement

दरम्यान, तहसील पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला असून नेमके किती नुकसान झाले याचा अंदाज घेतला जात आहे.

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions

ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice #ShivSenaUBT #Politics #news

चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice...

चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding  #MaharashtraNews #newsupdate

चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding #MaharashtraNews #newsupdate

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges