Published On : Wed, Sep 30th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या बडा ताजबागमध्ये मंडप डेकोरेशनच्या दुकानाला भीषण आग; ७० लाखांचे नुकसान

Advertisement

Nagpur Bada Tajbagh Shop Fire: ₹70 Lakh Loss

नागपूर -बडा ताजबाग परिसरात मध्यरात्री मंडप डेकोरेशनच्या दुकानाला भीषण आग लागल्याने खळबळ उडाली. आगीत दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले असून, प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ७० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

बड़ा ताजबाग परिसरातील हाजी मोहम्मद वकील यांच्या मंडप डेकोरेशनच्या दुकानातून रात्री सुमारे १२ वाजून ११ मिनिटांनी अचानक धूर निघताना नागरिकांच्या निदर्शनास आले. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच सक्करदरा अग्निशमन केंद्राच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्याचे काम सुरू केले.

Gold Rate
Sept 29,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 47,300 /-
Gold 22 KT ₹ 1,36,5700 /-
Silver/Kg ₹ 2,22,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत दुकानातील मंडप डेकोरेशनचे साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले होते. अग्निशमन विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार या आगीत सुमारे ७० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

आग लागण्यामागे शॉर्ट सर्किट हे प्राथमिक कारण सांगितले जात असले तरी, आगीचे नेमके कारण आणि नुकसानीची अंतिम रक्कम तपासानंतर स्पष्ट होणार आहे. या घटनेची पोलिसांतही नोंद करण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.