Published On : Sat, May 30th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरच्या महालमधील ‘आशीष एनएक्स’ शोरूमला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जळून खाक!

Advertisement

नागपूर : शहरातील गजबजलेल्या महाल परिसरातील ‘आशीष एनएक्स’ या रेडिमेड कपड्यांच्या शोरूमला शनिवारी सकाळी भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. आगीने काही मिनिटांतच शोरूमचा संपूर्ण मजला व्यापला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचा कपड्यांचा साठा जळून खाक झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास शोरूममधून धूर निघत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. आग वेगाने पसरत असल्याने अग्निशमन विभागाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली.

धुराचे प्रमाण जास्त असल्यामुळे आणि आत प्रवेश करण्यास अडचणी येत असल्याने अग्निशमन दलाला शोरूमच्या मागील बाजूची भिंत तोडावी लागली. त्यानंतर आग विझविण्याचे काम अधिक प्रभावीपणे करण्यात आले.

घटनेनंतर पोलिसांनी परिसर बंदोबस्ताखाली घेत नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवले. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात असला तरी नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Advertisement

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आग पूर्णपणे विझल्यानंतर नुकसानाचा अंतिम पंचनामा केला जाणार आहे. मात्र शोरूममधील मोठ्या प्रमाणावरील कपड्यांचा साठा जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.