Published On : Mon, Oct 7th, 2019

63 व्या धम्मचक्र महोत्सवानिमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल मध्ये उसळला जनसागर

Advertisement

स्लग:-लाखोंच्या संख्येतील निळ्या पाखरांची उपस्थिती

कामठी:- दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे ओगावा सोसायटीच्या वतीने 63 व्या धम्मचक्र प्रवर्तन महोत्सवाचे आयोजन 8 ऑक्टोबर ला आयोजित करण्यात आले आहे. या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या एक दिवसांपूर्वीच विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे देशाच्या कोनाकोपऱ्यातून आलेल्या लाखोंच्या संख्येतील जनसागर उसळला .

या 63 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे मंगळवार 8 ऑक्टोबर ला सकाळी 10 वाजता भदंत ज्ञानज्योति महाथेरो व पुज्यनिय भिक्षु संघाच्या मुख्य उपस्थितीत तसेच ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा व राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्या ऍड सुलेखाताई कुंभारे यांच्या विशेष उपस्थितीत विशेष बुद्ध वंदना घेण्यात येईल. त्यानंतर दुपारी 3.50वाजता केंद्रीय राज्यमंत्री किरण रीजुजी यांच्या हस्ते व माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे यांच्या मुख्य उपस्थितीत ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट थीम पार्क व कन्व्हेन्शन सेंटर च्या वेबसाईट चे लॉचिंग व माहिती पुस्तिका चे विमोचन करण्यात येईल.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसर विद्दुत रोषणाईने सज्ज करण्यात आले असून लाखोंच्या संख्येत येणाऱ्या अनुयायांसाठी पुरेशा सुविधा सज्ज करण्यात आल्या आहेत.देशाच्या कोनाकोपऱ्यातून येणाऱ्या 4 लाख संख्येच्या वरील अनुयायांच्या सोयीसाठी पवित्र दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेस टेम्पल पर्यंत 300 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था , स्वच्छता , 24 तास वीज पुरवठा, भोजनदान वाटप , नियंत्रण कक्ष तयार करण्यात आले आहे.तसेच पोलीस विभागातर्फे जागोजागी केलेल्या चोख व्यवस्थेसह स्वयंसेवक सुदधा स्वयंसेवेची भूमिका सकारात आहेत.

संदीप कांबळे कामठी