Published On : Mon, Oct 7th, 2019

कामठी विधानसभा मतदार संघ निवडणुकीत तीन अपक्ष उमेदवारांचे उमेदवारी अर्ज मागे

कामठी : -आगामी 21 ऑक्टोबर ला होऊ घातलेल्या 58 कामठी विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी जाहीर निवडणूक कार्यक्रमानुसार काल 4 ऑक्टोबर दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र सादर करण्याच्या अंतिम मुदती पर्यंत 18 उमेदवारांनी 21 नामनिर्देशन पत्र सादर केले होते त्यातच 5 ऑक्टोबर ला निवडणूक विभागातर्फे झालेल्या अर्ज छाननीत तीन उमेदवारांचे उमेदवारी अर्ज रद्द झाल्याने 15 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले होते

आज 7 ऑक्टोबर ला दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीत कांग्रेस चे कामठी तालुकाध्यक्ष पदावर असलेले अपक्ष उमेदवार नाना कंभाले यांनी कांग्रेस चे उमेदवार सुरेश भोयर यांच्या समर्थनार्थ उमेदवारी अर्ज मागे घेतले तसेच अपक्ष उमेदवार गणेश पाटील , अपक्ष उमेदवार सुलेमान अब्बास वल्द चिराग अली हैदरी या तीन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले यानुसार 12 उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत.

यानुसार टेकचंद श्रावण सावरकर(भाजप), सुरेश यादवराव भोयर(कांग्रेस),प्रफुल आनंदराव मानके (बसपा),राजेश बापूराव काकडे (वंचित बहुजन आघाडी),शकीकुर रहमान अतिकुर रहमान(एमाईमआईम),गौतम नामदेव गेडाम उर्फ भन्ते धम्ममित्र (राष्ट्रीय जनसंभावना पार्टी),अशोक राजाराम रामटेके(आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडिया) आणि अपक्ष उमेदवारामध्ये मंगेश सुधाकर देशमुख, भीमा विकास बोरकर,, शुभम संजय बावंनगडे, ज्ञानेश्वर पन्नालाल कंभाले, रंगनाथ विट्ठल खराबे चा समावेश आहे.यानुसार 7 पक्षीय उमेदवार तर 5 अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.


संदीप कांबळे कामठी