Published On : Fri, May 15th, 2020

मास स्क्रिनिंग केल्यामुळे मोठ्याप्रमाणात लोकांना बाहेर काढले जाईल आणि त्यामुळे आकडे वाढतील परंतु त्यानंतर ही परिस्थिती कंट्रोलमध्ये येईल – नवाब मलिक

खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णांचा सर्व खर्च महानगरपालिका करणार

आज महानगरपालिका व झोन – ५ मधील सर्व वॉर्ड अॉफिसरांची बैठक नवाब मलिक यांच्या उपस्थितीत झाली…

Advertisement

मुंबई दि. १५ मे – मुंबई महानगर पालिकेच्या झोन पाचमध्ये मास स्क्रिनिंग केल्यामुळे मोठ्याप्रमाणात लोकांना बाहेर काढले जाईल आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये चांगल्या सुविधा दिल्या जातील. यामध्ये सुरुवातीला कोरोनाबाधित आकडे वाढतील परंतु त्यानंतर ही परिस्थिती कंट्रोलमध्ये येईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

आज महानगरपालिका व झोन-५ मधील सर्व वॉर्ड अॉफिसरांची बैठक नवाब मलिक यांच्या उपस्थितीत झाली.

एकच परिपत्रक सर्व हाऊसिंग सोसायटींना जाईल. ते स्वतः लोकांची स्क्रिनिंग करतील. त्यामध्ये त्यांचा ताप, अॉक्सीजन लेवल तपासतील. जे गरीब आहेत. ज्या चाळी आहेत त्यामध्ये मास स्क्रिनिंगचे काम केले जाईल. यासाठी लागणारी साधने महानगरपालिका देईल. याशिवाय यामध्ये सामाजिक व स्वयंसेवी संस्थांना जोडण्यात येईल. मास स्क्रिनिंगचे काम तीन वॉर्डमध्ये आजपासून सुरू झाले आहे. ज्यावेळी मास स्क्रिनिंगचे काम सुरू झाल्यानंतर मोठ्याप्रमाणात रुग्ण बाहेर येतील त्यांना खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात येईल. सध्या तीन वॉर्डमध्ये ३०० बेड उपलब्ध आहेत हेही नवाब मलिक यांनी सांगितले.

मुंबई महानगरपालिका जेव्हा खाजगी हॉस्पिटलना ताब्यात घेईल त्यावेळी तेथे दाखल रुग्णांचा सर्व खर्च महानगरपालिका करणार आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

ज्याठिकाणी अल्पसंख्याक समाजाची लोकसंख्या आहे. त्यांना क्वॉरनटाईन करण्यासाठी मदरसे आणि मस्जिदी खाली आहेत. ते स्वतःहून तयार असतील तर त्या ठिकाणांना क्वॉरनटाईन सेंटर म्हणून त्या वापरल्या जातील असेही नवाब मलिक म्हणाले.

दरम्यान आज हे सगळे निर्णय घेण्यात आले असून महानगरपालिका आयुक्तांनी या निर्णयांना मान्यता दिली आहे असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement