Published On : Tue, Mar 20th, 2018

Video: मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री यांच्या घराजवळ अवैध धंध्यांचा बाजार


नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थान पासून 500 मीटर च्या अंतरावर पोलिस बंदोबस्तात सट्टा बाजार चालू असल्याची चर्चा गोकुळपेठ बाजारात चालू आहे. एका हेवीवेट महिला उपनिरीक्षकाच्या आश्रयाने हा सट्टा बाजार चालत असल्याने तेथील स्थानिक नागरिक सुद्धा त्रस्त आहेत.

या सट्टा बाजार चा एक वीडियो सद्ध्या चर्चेचा विषय ठरला आहे. वारमवार या सट्टा बजार ची तक्रार पोलिस स्टेशन ला करून सुद्धा पोलिस या कडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी आता ठोस भूमिका घेण्याचे ठरवले आहे व त्या सट्टा बाजार व पोलिसांविरुद्ध स्वाक्षरी अभियान सुरू केले आहेत. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर व घराशेजारी सर्रास हुक्का पार्लर सुरू असल्याने पोलिस प्रशासन नेमके कोणाला सहकार्य करत आहे याच्यावर प्रश्नचिन्ह उठत आहे. स्थानिक पोलिस संदर्भात मागील काही दिवसात हुक्का पार्लर मालक कडून हप्ता वसुली ची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. आता हुक्का पार्लर ला व सट्टा बाजार ला नेमके कोणाचे संरक्षण आहे हे कळेना.