Published On : Thu, Mar 30th, 2017

बचत गटांच्या उत्पादनाला बाजारपेठ

नागपूर: महिलांच्या स्वयंरोजगाराला प्रोत्साहन मिळण्याकरिता ग्रामीण जीवन्नोती अभियान उमेद अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील स्वयंसहायता बचत गट व कारागिरांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे जिल्हास्तरीय प्रदर्शनीचे आयोजन स्थानिक आमदार निवास परिसरात करण्यात आले आहे. प्रदर्शनीचे उद्घाटन महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले .

यावेळी जिल्हा परिषद प्रकल्प संचालक मकरंद नेटके, सहाय्यक प्रकल्प अधिकारी भाग्यश्री भोयर आणि बचत गटाच्या माहिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.

Advertisement

महिलांना स्वयंरोजगाराचे दालन खुले व्हावे, ग्रामीण भागातील महिलांचे सबळीकरण व्हावे याकरिता ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत बचत गटांची स्थापना करण्यात आली. बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना रोजगारासोबत त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी याकरिता बचत गटांच्या वस्तूंच्या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येत असल्याचे प्रतिपादन मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.

नागपूर जिल्ह्यातील 13 पंचायत समिती अंतर्गत येणारी बचत गट, महिला आर्थिक विकास महामंडळ महानगरपालिका क्षेत्रातंर्गत दारिद्रय रेषेखालील ६५ बचत गटांनी जिल्हास्तरीय प्रदर्शनीत सहभाग घेतला आहे. सामूहिक प्रयत्नातून महिला बचत गटांनी स्वयंरोजगाराचा मार्ग निवडला असून, बचत गटांच्या स्टॉलला भेट देण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. प्रदर्शनीत लाकडापासून तयार केलेल्या वस्तू, हॅण्डलूम बॅग, सॉफ्ट टॉईज, डिटर्जंट पावडर, फिनाईल, मिरची, हळद, धने पावडर, कराळ चटणी, फरसान, पापडांचे विविध प्रकार, लोणच्याचे विविध प्रकार, शेतीपयोगी असलेले गांडूळ खत, कंपोस्ट खत विक्रीकरिता आहे. बचत गटांना भेटी देणाऱ्या खवय्येकरिता अस्सल वऱ्हाडी जेवणाचा स्टॉल लावण्यात आला असून खवय्येगिरांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे .

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement