नागपूर:-महाराष्ट्र राज्य व उच्च तंत्रज्ञान विभागामार्फत करियर कट्टा या उपक्रमाला चळवळीचे स्वरूप आल्याचा आनंद आहे. मात्र यातून यूपीएससी मधले यश वाढले पाहिजे. दिल्लीमध्ये मराठी टक्का वाढला पाहिजे, असे आवाहन शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले. या उपक्रमात ते नागपूर येथून सहभागी झाले होते.