Published On : Sat, Feb 27th, 2021

कामठी बस स्थानकात मराठी भाषा गौरव दिन’ व ‘राजभाषा मराठी दिन साजरा’

कामठी :-महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४’ नुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे घोषित झाले. ‘मराठी भाषा गौरव दिन’ दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी श्री विष्णू वामन शिरवाडकर उर्फ (कुसुमाग्रज) यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो.यानुसार आज 27 फेब्रुवारीला कामठी बस स्थानक येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुरेश अढाऊ यांच्या शुभ हस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन वाहण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सुरेश अढाऊ यांनी आपल्या मार्गदर्शनार्थ सांगितले की कवी कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस’मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी इ.स. २०१३ रोजी घेण्यात आला.होता यानुसार दरवर्षीप्रमाणे यावर्षो सुद्धा मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी कामठी बस स्थानक वाहतूक नियंत्रक पदमाकर कांनफाडे , रोशन खुर्गे, गणेश दर्शनवार,मनोज सौदाई, तसेच कामठी नगर परिषद चे माजी सभापतो व नगरसेवक मो अकरम, कृष्णा पटेल, नितु दुबे, विजय जौस्वाल , इंदलसिंग यादव, अंकुश मेश्राम, दुर्गेश शेंडे, राजेश गजभिये, कोमल लेंढारे आदी उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement