Published On : Sat, Feb 3rd, 2018

मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते लोकराज्यचा फेब्रुवारी महिन्याचा अंक प्रकाशित

मुंबई: साहित्य संमेलन, मराठी भाषा आणि व्यवसाय मार्गदर्शन यावर आधारित लोकराज्यचा फेब्रुवारी महिन्याचा विशेषांक मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते आज येथे प्रकाशित झाला.

मंत्रालय परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमास माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती/प्रशासन) अजय अंबेकर, संचालक (माध्यम समन्वयक) शिवाजी मानकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बडोदा येथे होत असलेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी ‘साहित्य संमेलनाचे महत्त्व’ यावर लिहिलेला लेख या अंकाचे वैशिष्ट्य आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या चरित्र साधनांची ओळख, मराठी भाषा विभागाचे उपक्रम, अक्षरसाधना कशी करावी या विषयांवरील लेखांचा अंकात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर मराठी भाषा धोरण आखणीत भाषा सल्लागार समितीची भूमिका विषद करणारी डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखतही या अंकात आहे.

व्यवसाय मार्गदर्शन
या अंकात पुढील विषयांचा समावेश आहे : यशोशिखरावर कसे जाल ? (अविनाश धर्माधिकारी), समाज माध्यमांची शक्ती (प्रा. रवींद्र चिचोलकर), कलेचा आनंद आणि आनंदाची कला (प्रा. गजानन शेपाळ), डॉ. आंबेडकर थॉट: नवी संधी (डॉ. प्रदीप आगलावे), पुरातत्त्व शास्त्र – शोध मानववंशाचा (हर्षदा विरकूड), स्वप्नांना शिष्यवृत्तीचे बळ (वर्षा फडके, विष्णू काकडे, शैलजा वाघ-दांदळे), यशदामध्ये नागरी सेवा परीक्षेची तयारी (डॉ. बबन जोगदंड), प्रशासकीय सेवेचा राजमार्ग (डॉ. म.बा. भिडे), कौशल्यातून उन्नतीकडे, दर्जेदार संस्था-सर्वोत्कृष्ट शिक्षण, कार्पोरेट प्रशासनाचे सूत्रधार. मराठी भाषा आणि करीअर संधी.

६० पृष्ठांच्या या अंकाची किंमत १० रु. आहे.

Advertisement
Advertisement