Published On : Mon, Aug 5th, 2019

पावसामुळे विदर्भ, दुरंतोसह अनेक गाड्या रद्द

Advertisement
Train.jpg

File Pic

नागपूर: मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकडे जाणारी व मुंबईवरून येणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून, विदर्भ, दुरंतोसह अनेक गाड्या रद्द झाल्या आहेत, तर काही गाड्या मधूनच माघारी फिरविण्यात आल्या आहेत पावसामुळे विदर्भ, दुरंतोसह अनेक गाड्या रद्द.

३ ऑगस्ट रोजी रात्री नागपूरवरून निघालेली १२२९० नागपूर- मुंबई दुरंतो एक्स्प्रेस ही गाडी फक्त इगतपुरीपर्यंतच जाऊ शकली. त्यामुळे ४ रोजी ही गाडी इगतपुरीवरून रिकामीच नागपूरला परत आली. त्याचप्रमाणे ४ ऑगस्ट रोजी मुंबईवरून सुटणाऱ्या विदर्भ तसेच मुंबई-नागपूर दुरंतो एक्स्प्रेस या गाड्या ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने अनेक प्रवासी मुंबई स्थानकावर अडकून पडले. सर्वांत गैरसोय ३ रोजी नागपूरवरून निघालेल्या दुरंतोमधील प्रवाशांची झाली. मुंबईला निघालेल्या प्रवाशांना अचानक इगतपुरीनंतर आता पुढे जाता येणार नसल्याचे कळल्यावर ते हतबल झाले होते. विशेषत: लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. एकूणच मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असल्याने रस्ते मार्गानेही मुंबईत जाता सहज जाता येईल अशी स्थिती नव्हती. यातील अनेकजण शेवटी इगतपुरीवरून परत फिरले.

१२८१२ हतिया-एलटीटी, ११०४० गोंदिया- कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस, ११४०३ नागपूर- कोल्हापूर या ३ ऑगस्ट रोजी सुटलेल्या गाड्या अर्ध्या प्रवासातूनच परत गेल्या. १२८११ एलटीटी- हतिया एक्स्प्रेस ही ५ ऑगस्ट रोजीची गाडी रद्द करण्यात आली आहे.

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

४ रोजी रद्द झालेल्या गाड्या अशा- १२८५९ सीएसटी- हावडा, १२८६९ सीएसटीएम- हावडा, ११४०१ सीएसटीएम- नागपूर रद्द, १२२६१ सीएसटीएम- हावडा रद्द, १२१०५ सीएसटीएम- गोंदिया रद्द, १२२८९ सीएसटीएम – नागपूर दुरंतो रद्द, १२८०९ मुंबई- हावडा रद्द. १२१४० नागपूर- मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस रद्द.

१२१०६ ही ४ रोजी सुटलेली विदर्भ एक्स्प्रेस वर्धेवरूनच परत आली. १२१०२ हावडा – मुंबई ही ४ रोजी हावड्यावरून सुटलेली व ५ रोजी नागपुरात येणारी गाडी रद्द करण्यात आली आहे. १२८१० हावडा- मुंबई ही आज हावड्यावरून निघालेली व ५ रोजी नागपूर मार्गे जाणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement