Published On : Tue, Feb 11th, 2020

रामटेक येथिल लोक अदालतीत अनेक प्रकरणांचा निपटारा

रामटेक : दिवाणी न्यायालय, रामटेक येथे राष्ट्रीय अदालतीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे नागपुर चे सहदिवाणी न्यायाधीश जे डी जाधव तसेच अध्यक्ष स्थानी रामटेक दिवानी न्यायलयाच्या दिवाणी न्यायधीश व्ही.पी धुर्वे यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली.

न्यायधिश जे.डी जाधव यांनी आपल्या भाषणामध्ये लोकअदालतिचे महत्व समजावून सांगितले तसेच न्यायालया तर्फे नियमित संपन्न होणाऱ्या लोक अदालतीचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. या प्रसंगी दिवानी न्यायाधीश व्ही. पी. धुर्वे म्हणाल्या की वाद तडजोडीने मिटल्याने पक्षकारांना ही दिलासा मिळतो. वाद निकाली निघाल्यास पुन्हा त्याच खटल्यांसाठी कोर्टाची पायरी चढण्याची आवश्यकता भासत नाही याशिवाय लोकन्यायालयात प्रकरणे निकाली निघाले तर कायद्यानुसार कोर्ट फी ची रक्कम परत मिळते असे मत व्यक्त केले. ………… लोक अदालती मधे न्यायालयातील 6 फौजदारी व 2 दिवाणी प्रलंबित प्रकरणे तसेच 9 वाद पूर्व प्रकरणांचा निकाल लावण्यात आला व ऐकून 3,70,498/- रुपयांची वसुली करण्यात आली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूर यांच्या निर्देशा नूसार रामटेक तालुका विधी सेवा समितीतर्फे आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयाचे सकाळी अकरा वाजता आयोजन करण्यात आले.

न्यायालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर खटले प्रलंबित आहेत या खटल्यांचा निपटारा व्हावा याकरिता लोकअदालत सारखा भरभक्कम पर्याय गेल्या अनेक वर्षापासून अवलंबला जातो आहे.


तडजोडीने प्रकरणे निकाली काढणे हा त्यामागील उद्देश असून मिटलेल्या प्रकरणात अपील नसल्याने वादालाही पूर्णविराम मिळतो.

महिने महिन्यांची प्रलंबित प्रकरणे निकाली निघावी त्याकरिता महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशाने नुकतेच जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते .या लोक अदालतीचे संचालन वकील आनंद गजभिये व आभार प्रदर्शन वकील महेंद्र येरपुडे यांनी केले. यावेळेस तालुका वकील संघाचे अध्यक्ष एम. एन् नवरे , हरिश हटवार , गुलाब मेश्राम , मयुर गुप्ता व कुंती गडे वकील प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाच यशस्वितेाठी न्यायालयीन कर्मचारी लघुलेखक धोपटे ,सहा. अधिक्षक सौ अंजली जोशी , अतुल कोतेवार , वरिष्ठ लिपिक शेरके, मोहन पिंजरकर , सौ छाया खापरे , कनिष्ठ लिपिक आकाश येरपुडे महेश सुरपाम व देव यांचे सहकार्य लाभले.