Published On : Sun, Jul 18th, 2021

ना. गडकरी यांनी घेतली स्व. मनोज ठवकर यांच्या कुटुंबियांची भेट

नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पोलिस मारहाणीत मृत्यू पावलेल्या स्व. मनोज ठवकर यांच्या निवास्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि सांत्वन केले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करताना स्व. मनोज यांच्या पत्नीला नोकरी देण्यासंदर्भात शक्य ती सर्व मदत करण्याचे सांगितले.

तसेच ज्येष्ठ स्वयंसेवक स्व. सत्यवानजी रारोकर यांचे नुकतेच कोविडमुळे निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांचेही ना. गडकरी यांनी त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले.

Advertisement

तोंडाला मास्क न लावल्याच्या कारणावरून पोलिस मारहाणीत मनोज ठवकर यांचा मृत्यू झाला होता. आ. कृष्णा खोपडे यांनी स्व. मनोज ठवकर यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून मुख्यमंत्री ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे यांना निवेदन दिले. आ. खोपडे यांच्या पाठपुराव्यामुळे सीआयडी चौकशी होईपर्यंत दोषी पोलिस अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे.

पूर्व नागपुरातील ना. गडकरी यांच्या संपूर्ण दौर्‍यात आ. कृष्णा खोपडे, संजय अवचट, नगरसेवक दीपक वाडीभस्मे, प्रमोद पेंडके, वैशाली वैद्य, जयश्री रारोकर, मनोज चापले, पांडुरंग मेहर, देवेंद्र मेहर, योगेश रारोकर, गंगाधर लेंडे, राजेश झाडे, संजय मानकर, राजू दिवटे, कपिल लेंडे, रितेश राठे आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement