Published On : Mon, Apr 23rd, 2018

मनोज चापले यांनी केली फ्रेण्डस्‌ कॉलनी येथील नाल्याची आकस्मिक पाहणी

नागपूर: नागपूर महानगरपालिकेचे वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांनी सोमवारी (ता.२४) फ्रेण्डस्‌ कॉलनी येथील नाल्याची आकस्मिक पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत धरमपेठ झोन सहायक आयुक्त महेश मोरोणे उपस्थित होते.

पावसाळ्यापूर्वी शहरातील संपूर्ण नाल्यांची सफाई व्हावी यासाठी वेळोवेळी नाला साफ करण्याचे निर्देश दिले असताना देखिल अद्याप नाला स्वच्छ केला नाही म्हणून सभापती मनोज चापले यांनी नाराजी व्यक्त केली. नाला साफ न केल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाल्याने तेथील नागरिक त्रस्त झाले आहे. याबाबत नागरिकांनी वारंवार धरमपेठ झोनमध्ये तक्रार केली असता, अद्याप नाल्याच्या सफाईचे काम न झाल्याने सभापती मनोज चापले यांनी संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. पावसाळ्यापूर्वी नाला साफ करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यावेळी त्यांच्यासमवेत राजेश हाथीबेड आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement