Published On : Fri, May 29th, 2026
By Nagpur Today Nagpur News

मानकापूर पोलिसांची मोठी कामगिरी; ७.६० लाखांचे ५७ मोबाईल मालकांना परत

Advertisement

नागपूर : मानकापूर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि अथक परिश्रमाच्या जोरावर मोठे यश मिळवले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत चोरीस गेलेले आणि हरवलेले तब्बल ५७ मोबाईल शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे ७ लाख ६० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मानकापूर पोलिसांनी आधुनिक ट्रॅकिंग सिस्टीम आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने रेडमी, सॅमसंग, व्हिवो, ओप्पो आणि आयफोनसह विविध कंपन्यांचे मोबाईल शोधून काढले. पोलिस उपायुक्त नित्यानंद झा यांच्या हस्ते संबंधित मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले.

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक हरेश काळसेकर यांच्यासह मानकापूर पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

यावेळी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की, मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल करावी, जेणेकरून तांत्रिक तपासाद्वारे तो शोधणे सोपे होईल.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.