Published On : Tue, Oct 5th, 2021

मानस ऍग्रो कंपनीत काम बंद आंदोलन

आज संपाचा सहावा दिन

बेला : जवळच्या खुरसापार येथील मानस ऍग्रो अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीतील अंदाजे साडेपाचशे कामगारांनी विविध मागण्यांसाठी 1 ऑक्टोंबर पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.संपाचा आज सहावा दिवस आहे. तरी पण अजून पर्यंत व्यवस्थापनाने त्यांचे मागण्यांवर समाधानकारक तोडगा काढला नाही .केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे नेतृत्वातील ही कंपनी आहे.

जून जुलै व ऑगस्ट महिन्याचे थकीत वेतन मिळावे, दर महिन्याला एका विशिष्ट नियत तारखेला पगार द्यावा ,शासन नियमानुसार दोन वर्षाचा महागाई भत्ता मिळावा, थकित पी एल रजेची रक्कम मिळावी व दिवाळीचे दिवाळीची बोनस राशी एक महिन्यापुर्वी मिळावी .आदी मागण्यांसाठी काम बंद आंदोलन

उभारण्यात आले आहे .गडकरी द्वारा संचालित पूर्वीच्या पूर्ती साखर कारखान्यांचे नामांतरण मानस ऍग्रो कंपनीत करण्यात आले आहेत . 21 वर्षांपासून कार्यरत या कंपनीतून साखरेसह वीज इथेनॉल ,जैविक खते इत्यादी उत्पादने निर्माण केल्या जाते.

कंपनीतील कामगारांना अत्यंत कमी वेतन दिले जाते .त्यामुळे वाढत्या महागाईत त्यांना आपला प्रपंच करणे कठीण झाले आहे . केंद्र व राज्य शासनाने वेतनवाढी संदर्भात शिफारस, परिपत्रक व करार वेळोवेळी जारी केले ,असतानाही येथील कामगारांना त्या मिळत नाही .असा कामगारांचा आरोप आहे.यासंदर्भात कामगारांनी कंपनीला दिलेल्या पत्रातून 17 सप्टेंबरला याबाबत कळविले आहेत. सदर मागण्या 30 सप्टेंबर पर्यंत पूर्ण झाल्या नाही.,तर एक ऑक्टोंबर पासून काम बंद करण्यात येईल असा इशाराही त्यामध्ये देण्यात आला होता.

आमदार राजू पारवे भेटले
उमरेड चे आमदार राजू पारवे यांनी आंदोलक कामगारांची भेट घेऊन त्यांचे मागणीला पाठिंबा दिला. त्यांनी कामगार नेते यशवंत डेकाटे, नामदेव उमाटे, बाबा तिमांडे, सुनील बानकर व अनेक कामगारांचे उपस्थितीत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सोमवंशी यांची भेट घेतली व समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला . पण तो निष्फळ ठरला.

कामगारांचे मागणीवर व्यवस्थापन व संचालक मंडळात विचार सुरू आहे .लवकरच तोडगा निघेल.पण सर्व मागण्या मान्य होणार नाही.काही सोडवण्याचा प्रयत्न करू ,वीज देयक उशिरा येते.त्यामुळे पगार वाटपात दिरंगाई होते.कोरोनात कारखाना बंद असतानाही कंपनीने कामगारांना दिवाळीचा बोनस दिला आहे.
मनोज सोमवंशी
व्यवस्थापकीय संचालक.