Published On : Fri, Jun 19th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात २०० रुपयांच्या सुट्ट्यांच्या नादात लॅपटॉप गमावला; ई-रिक्षाचालकानेच साधला डाव

Advertisement

नागपूर : सुट्टे पैसे आणण्यासाठी प्रवाशाला खाली उतरवून त्याचाच विश्वासघात करत लॅपटॉप असलेली बॅग घेऊन पसार झालेल्या ई-रिक्षाचालकाला गणेशपेठ पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून चोरीचा मुद्देमाल आणि वारदातीत वापरलेली ई-रिक्षाही जप्त करण्यात आली आहे.

गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आशीर्वाद टॉकीज परिसरात ही घटना घडली. रामानंद मिश्रा हे धंतोली येथून ई-रिक्षाने आशीर्वाद टॉकीजजवळ आले होते. प्रवासाचे भाडे ३० रुपये झाल्यानंतर त्यांनी चालकाला २०० रुपयांची नोट दिली. मात्र, सुट्टे पैसे नसल्याचे सांगत चालकाने त्यांना जवळून सुट्टे घेऊन येण्यास सांगितले.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी चालकाने “बॅग रिक्षातच ठेवा” असे सांगत विश्वास संपादन केला. बॅगेमध्ये लॅपटॉप आणि कंपनीचे महागडे घड्याळ होते. मिश्रा सुट्टे पैसे आणण्यासाठी गेल्यानंतर चालकाची नीयत फिरली आणि त्याने बॅगसह ई-रिक्षा घेऊन तेथून पलायन केले.

परत आल्यानंतर रिक्षा आणि बॅग दोन्ही गायब असल्याचे लक्षात येताच मिश्रा यांनी परिसरात शोधाशोध केली. मात्र काहीच धागादोरा न लागल्याने त्यांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Advertisement

तक्रार मिळताच पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा माग काढला. तपासादरम्यान नामंत दगडू शहानी या ई-रिक्षाचालकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीस गेलेली लॅपटॉप बॅग तसेच गुन्ह्यात वापरलेली ई-रिक्षा जप्त करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास गणेशपेठ पोलीस करत आहेत.

Advertisement
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews #Crime #CCTVCrime

Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप #NagpurNews #POCSOCase #InstagramCrime

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake #Crime #newsupdate

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट #NagpurNews  #Crime #CCTVFootage #news

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला!   #MaharashtraNews #Newborn #Politics

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews #MurderCase #CrimeNews

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges