Published On : Mon, Mar 22nd, 2021

विटाने ठेचून तरुणाचा खून

Advertisement

कामठी :-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या हरदास नगर येथे हरदास व्यायाम शाळेजवळील गोविंद कवेलू भंडार जवळ विटाने ठेचून एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना आज 22 मार्च ला सकाळी 6 वाजता निदर्शनास आली असून मृतक तरुणाचे नाव विवेक रमेश हुमने वय 37 वर्षे रा.हमालपुरा कामठी असे आहे. खून करण्याचे कारण अजूनही कळू शकले नसले तरी घटनास्थळाच्या नजीकच एक बेवारस दुचाकी मिळाली असून या दुचाकीवरून विविध तर्क वितर्क लावण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा सदर घटनास्थळी मार्गे जात असता कुणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणावरून मृतकाच्या डोक्यावर विटाने ठेचुन खून केल्याची घटना गतरात्री घडली असून खून करण्याचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.घटनेची माहीती मिळताच डीसीपी निलोत्पल , एसीपी रोशन पंडित, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय मालचे, एपीआय युनूस शेख, मदनकर आदींनी घटनास्थळी भेट दिली दरम्यान ठसेतज्ज्ञ पथकांनी सुद्धा घटनास्थळ गाठून घटनास्थळी असलेल्या रक्ताच्या डागाचे नमुने घेतले तसेच या मार्गावरून गेलेले दुचाकीच्या टायर चे सुद्धा नमुने घेतले .

Gold Rate
10 july 2025
Gold 24 KT 97,000 /-
Gold 22 KT 90,200 /-
Silver/Kg 1,07,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

घटनास्थळच्या नजीकच एका घरासमोर उभी ठेवलेली बेवारस असलेले काळ्या रंगाची पल्सर क्र एम एच 31 बी एफ 3747 आढळून आली असुन या दुचाकी वरून कदाचित आरोपीचा सुगावा लागणार असल्याचे तर्क वितर्क लावण्यात येत आहे. पोलिसांनी सदर घटनेची नोंद करीत अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवित घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनार्थ शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.मृतक तरुणाच्या पाठीमागे आई व एक भाऊ असा आप्तपरिवार आहे.

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement