Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Aug 1st, 2018

  ममता बॅनर्जी यांची अडवाणी भेट, इतर नेत्यांच्याही भेटीगाठी : पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी फिल्डिंग

  नई दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र ममता बॅनर्जी यांनी आज संसद भवन येथे भाजपाचे वरिष्ठ नेता लालकृष्ण अडवाणी यांच्याशी भेट घेऊन आडवाणी यांचे चरणस्पर्श केले. यापूर्वी आडवाणीचे निकटचे चंदन मित्रा यांनी भाजपा सोडून तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे.

  आडवाणी यांच्या जवळच्या लोकांचे म्हणणे आहे कि, ही एक रुटीन बैठक आहे. जेव्हा केव्हा ममता बॅनर्जी दिल्लीला येतात तेव्हा त्या संसद भवन येथे आडवाणी यांची भेट घेतात. आज त्यांनी देशात सुरु असलेल्या राजकीय मुद्दांवर चर्चा केली. ममतांनी आडवाणी यांच्यासोबत 15 मिनिटे बोलणी केली.

  मजेशीर बाब म्हणजे ममता संसद भवन आल्यानंतर सर्वात आधी त्यांनी आडवाणी यांची भेट घेतली. या भेटीनंतर ममता म्हणाल्या, मी आडवाणी यांना दीर्घ काळापासून ओळखते. आज त्यांना भेटून त्यांची विचारपूस केली. त्या म्हणाल्या कि मी यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांना आग्रह केला आहे कि त्यांनी नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्सची वस्तुस्थिती पडताळण्यासाठी एक चमू आसामला पाठवावी.

  तत्पूर्वी ममता बॅनर्जी म्हणाल्या कि, 2019 मध्ये भाजपाच्याविरुद्ध विरोधी पक्षाचे सर्वसम्मत नेतृत्व असेल. ममता बॅनर्जी आपल्या तीन दिवसांच्या दिल्ली दौ-यावर आहेत. येथे त्या संसदेत विरोधी पक्षाच्या खासदारांना भेटल्या तसेच सायंकाळी सोनिया गांधी यांना त्यांच्या निवासस्थानी भेटतील. तर या दरम्यान त्या माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनासुद्धा कर्नाटक भवनात भेटतील. तर रात्री आठ वाजता साउथ ऐव्हन्यू येथे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटतील.

  ममता बॅनर्जी यांना विचारण्यात आले कि काय त्यांना प्रस्तावीत भाजपाविरोधी मोर्चासाठी पंतप्रधान पदाचे उमेदवार करू शकतात. ममता बॅनर्जीय यांना एक मजबूत दावेदार म्हणून बघितल्या जात आहे. 19 जानेवारीच्या रॅलीला विरोधी पक्षाच्या बॅनर्जी यांच्या पदाला अधिक बळकटी प्राप्त करण्याच्या हेतूने रंगीत तालिम मानल्या जात आहे. काँग्रेसने आधीच संकेत दिले आहे कि ते कुठल्याही स्थितीत गैर-रा.स्व. संघ समर्थित कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराला पंतप्रधान पदाचा उम्मेदवार बनविण्यास तयार आहे.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145