– माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आवाहन
नागपूर – स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्षे पूर्ण झाली म्हणून यंदा हे वर्ष स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून आपण मोठ्या थाटाने साजरे करीत आहोत. स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने ९ऑगस्ट क्रांती दिन ते स्वातंत्र्यदिन म्हणजेच १५ ऑगस्ट दरम्यान राज्यभर “आझादी गौरव झेंडा महोत्सव” आयोजित केला आहे. त्यानिमित्त आयॊजित “आझादी गौरव यात्रा” यशस्वी करा असे आवाहन माजी माजी ऊर्जामंत्री व पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.
रविवारी बेझनबाग येथील कार्यालयात उत्तर नागपूर ब्लॉक काँग्रेस कमिटी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली यावेळी डॉ. नितीन राऊत बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची “आझादी गौरव यात्रा” ९ ऑगस्टपासून सुरू होत आहे. ज्या ठिकाणाहून या यात्रेस प्रारंभ होणार आहे, त्या ठिकाणी काँग्रेस नेते, कार्यकर्ते व नागरिकांनी आपल्या व परिसरातील घरांवर राष्ट्रध्वज फडकावूनच यात्रेला सुरूवात करावी.
ज्या रस्त्याने ही यात्रा पुढे जाणार आहे त्या रस्त्यावरील गावे / शहरातील घरांवर राष्ट्रध्वज फडकवावा. प्रत्येक नागरिकाने देखील आपल्या घरावर तिरंगा फडकवावा यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे. घराघरांवर लावलेला तिरंगा स्वातंत्र्यदिनापर्यंत कायम ठेवावा. यासोबतच स्वातंत्र्यासाठी संघर्ष केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे ऋण व्यक्त करण्याची संधी आपल्याला आझादी गौरव पदयात्रेच्या निमित्ताने मिळत आहे, हे आपले परमभाग्य आहे. जे स्वातंत्र्यसैनिक हयात आहेत त्यांच्या घरी जाऊन त्यांचे चरणस्पर्श करावे. जे स्वातंत्र्यसैनिक हयात नाहीत त्यांच्या वीरपत्नी व वारस यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांचा यथोचित सन्मान करावा. प्रत्येक वस्तीतून हि पदयात्रा काढावी आणि नागरिकांना घरावर तिरंगा फडकविण्यास प्रोत्साहित करावे.
प्रसंगी ब्लाँक क्र १३, १४ आणि १५ चे पदाधिकारी उपस्थित होते.
अधिक माहित देताना डॉ. राऊत म्हणाले, झेंडा हा कोणत्याही राष्ट्राचे सार्वभौमत्व, अस्मिता, स्वाभिमान व सन्मानाचे प्रतिक असतो. जगातील कोणताही लढा हा झेंड्याखालीच लढला जातो. भारताचा स्वातंत्र्यलढा हा देखिल काँग्रेसच्या तिरंग्याखालीच लढला गेला. १५० वर्षांच्या संघर्ष, त्याग व बलिदानाने आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे. काँग्रेसच्या विचारातून निर्माण झालेला भारताचा राष्ट्रध्वज ‘तिरंगा’ अभिमानाने फडकताना प्रत्येक भारतीयांच्या मनात स्फुरण चढते. देशाच्या स्वाभिमानाचे प्रतिक असलेला आपला ‘तिरंगा’ प्रत्येकाच्या घरावर डौलाने फडकत राहिला पाहिजे.
२००२ च्या झंडा संहिताने तिरंगा फडकविण्यावर काही निर्बंध आले होते. पण काँग्रेसने न्यायालयीन लढाई लढून सर्व सामान्यांना झेंडा लावण्याचा अधिकार मिळवून दिला. ज्या संघटनेचे/ पक्षाचे स्वातंत्र्य चळवळीत कवडीमोलाचेही योगदान नाही व ज्यांनी तिरंग्याला अशुभ मानून आपल्या कार्यालयावर २००२ सालापर्यंत तिरंगा फडकवला नाही. भारतीय तिरंग्याला १९५० साली मान्यता मिळाली तेव्हापासून तर सन-२००० पर्यंत म्हणजेच तब्बल ५० वर्षे संघ मुख्यालयावर तिरंगा फडकला नाही. आता हेच लोक “घर घर तिरंगा” चा नारा देत जनतेला देशभक्ती शिकवीत आहेत आणि जनतेला भूल थापा देत आहेत. जनतेने महागाई, बेरोजगारी, जीएसटी सारख्या मुद्यांना विसरून आंदोलन करू नये, केंद्र सरकारला वेठीस धरू नये हे यामागचे षडयंत्र आहे.
यावेळी सेवादलचे राष्ट्रीय समन्वयक कृष्ण कुमार पांडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव संजय दुबे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत, नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रत्नाकर जयपुरकर, बंडोपंथ टेर्भुणे, हरिभाऊ किरपाने ब्लाँक १३ चे अध्यक्ष सुरेश पाटिल, ब्लाँक १५चे अध्यक्ष मुलचंद मेहर, साहेबराव सिरसाट, कल्पना द्रोणकर, विजया हजारे, रेखा लांजेवार, सतिश पाली, आसिफ शेख, जाँन जोसेफ, अनिरुद्ध पांडे, असद खान, माजी नगरसेवक दिनेश यादव, माजी नगरसेविका नेहा राकेश निकोसे सह ब्लाँक कार्यकारिणीचे पदाधिकारी, शहर काँग्रेसचे पदाधिकारी, प्रभाग अध्यक्ष, वार्ड अध्यक्ष व पक्षाचे सर्व फ्रंटल प्रमुख सह इतर मान्यवर उपस्थित होते.