– वडगाव धरणाचे 21 गेट उघडले
बेला : निम्न वेना प्रकल्पाच्या वडगाव जलाशयात पाण्याची आवक वाढल्यामुळे व धरण तुडुंब भरल्यामुळे सोमवारी सकाळपासून वेना नदीत धरणाने पाणी सोडले. त्यामुळे बेला नजीकच्या दहेली येथील पुलावरून पाणी वाहने सुरू होते .त्यामुळे नागपूर व सोनेगावकडे ये जा होणारी वाहतूक दिवसभर ठप्प पडली होती .
पुरामुळे नदी काठावरची शेती पूर्णपणे पाण्याखाली आली व पिके खरडून वाहून गेली त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.
वडगाव जलाशयाचा पाणी साठा 133.234 दलघमी असून धरण 99 टक्के भरले आहे. त्यामुळे संपूर्ण 21 गेट 85 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहे त्यातून 1642 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग प्रतिसेकंद सुरू आहे.
अशी माहिती धरणाचे शाखा अभियंता प्रणील वाघ यांनी दिली असून त्यांनी नदीकाठावरील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी सतर्क रहावे. जनावरांची जानमालाची खबरदारी घ्यावी व कोणीही नदीपात्र ओलांडू नये. अशी सूचना व विनंती त्यांनी केली आहे.