Published On : Fri, Jun 12th, 2026
By Nagpur Today Nagpur News

पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करा; विजेंद्र कळंबे यांचा नागपुरात लॉंग मार्च

Advertisement

नागपूर : राज्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे दिवसेंदिवस अधिक कठीण होत चालल्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते विजेंद्र कळंबे यांनी गुरुवारी नागपुरात लॉंग मार्च काढून पदवीपर्यंतचे शिक्षण सर्वांसाठी मोफत करण्याची मागणी केली.

सोमलवाडा ते रिझर्व्ह बँक चौक या मार्गावर काढण्यात आलेल्या या मार्चमध्ये विद्यार्थी, पालक आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शासनापर्यंत गोरगरीब विद्यार्थ्यांचा आवाज पोहोचविण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आल्याचे कळंबे यांनी सांगितले.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, शासनाकडून मुलींसाठी मोफत शिक्षण, मध्यान्ह भोजन योजना, तसेच आठवीपर्यंत मोफत पाठ्यपुस्तके अशा अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. मात्र पदवीपर्यंतचे शिक्षण विद्यार्थ्यांना स्वखर्चाने घ्यावे लागत असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहते.

Advertisement

सध्याच्या काळात शिक्षणाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून तो सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. त्यामुळे शासनाने पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करून सर्व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

मोर्चानंतर शासनाच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शिक्षणाच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणे ही काळाची गरज असल्याचे मत सहभागी नागरिकांनी व्यक्त केले.

“विद्यार्थी शिक्षित झाले तर राज्य प्रगत होईल आणि राज्य प्रगत झाले तर देश अधिक सक्षम व बलवान बनेल,” असे मत विजेंद्र कळंबे यांनी व्यक्त केले. या मागणीसाठी त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी 11 जून 2026 रोजी या लॉंग मार्चचे आयोजन केले होते.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.