Published On : Wed, Jul 24th, 2019

रक्तदानातून समाजासमोर आदर्श निर्माण करा – डॉ. भूषण कुमार उपाध्याय

शासकीय तंत्रनिकेतनचा वर्धापन दिन रक्तदानाने साजरा

नागपूर,: रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून समाजात युवा पिढीने नेहमी रक्तदान करण्यास पुढाकार घ्यावा, आज घडीला युवा पिढीने स्वत:चे आरोग्य सांभाळावे. तसेच निरोगी राहून रक्तदान करत समाजासमोर आदर्श निर्माण करावा असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांनी केले.

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ‘द ब्लड कनेक्ट’ या घोष वाक्यातून 105 वा वर्धापन दिन रक्तदान करत नुकताच साजरा करण्यात आला. त्यावेळी पोलिस आयुक्त बोलत होते.

या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. सी.एस. थोरात, प्रमुख पाहूणे डॉ. एस.जे. पाटील, श्रीकांत डोईफोडे, वुमेन्स टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या माजी प्राचार्या श्रीमती राधा व कार्यक्रम समन्वयिका डॉ. राजेश्वरी वानखडे उपस्थित होत्या.

एक थेंब रक्ताचा फुलवितो अंकुर जीवनाचा याची जाणीव ठेवत शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाने त्यांच्या 105 व्या वर्धापन दिनी उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गरजू व रुग्णांना सहज रक्त उपलब्ध होणार असल्याचे पोलिस आयुक्त डॉ. उपाध्याय यावेळी म्हणाले.

सर्व स्टेकहोल्डर्स सोबत रक्तदान शिबिर आयोजित करण्यामागचा हा संस्थेचा प्रथमच प्रयत्न असून मोठ्या प्रमाणावर रक्तदान होईल. रक्तदान करताना त्याला माणुसकी हाच धर्म असल्याचे ते म्हणाले.

तत्वपूर्वी प्रास्ताविक करताना कार्यक्रम समन्वयिका डॉ. वानखडे यांनी नुकत्याच नऊ अभियांत्रिकी शाखांना केवळ चार महिन्यात एन.बी.ए. मानांकन मिळाले असून ही विशेष उल्लेखनीय बाब आहे. एन.बी.ए. मानांकनाचे यश हे संपूर्ण संस्थेचे, सर्वांच्या सहकार्याचे आणि सहभाचे असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. वाळके प्रा. मुडे, प्रा. केळवदे, प्रा.काळे, प्रा. पांपट्टीवार, प्रा.सुप्रिया चौधरी, प्रा. चैताली चौधरी, प्रा. शिफा सय्यद, प्रा. पुंड, प्रा. तुळजापूरकर, प्रा. अजहर, प्रा. करुले, प्रा. अंबादे यांच्यासह माजी विद्यार्थी श्री. मेंढेकर, श्री. माथनीकर, मिलींद हेडाऊ, वैभव घुशे, श्री. मानीकपूरे, श्री. आतीफ यांनी विशेष प्रयत्न केले.