Published On : Tue, Jun 30th, 2020

कचरा घोटाळ्याच्या तक्रारीसंदर्भात चौफेर चौकशी करा!

Advertisement

आमदार विकास ठाकरेंच्या तक्रारीची दखल घेवून महापौर संदीप जोशी यांचे आयुक्तांना निर्देश

नागपूर : पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांच्या कडून शहरात कचरा घोटाळा होत असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. या तक्रारी संदर्भात सर्व बाजूंची पडताळणी करून अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौफेर चौकशी करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांना दिले.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शहरातील घराघरातून कचरा संकलीत करण्यासाठी मनपातर्फे बीव्‍हीजी आणि एजी एन्व्‍हायरो या दोन कंपन्यांना कंत्राट देण्यात आले आहे. या कंपन्यांच्या घंटागाड्यांद्वारे घराघरातून कचरा संकलीत केला जातो. संकलीत करण्यात आलेला कचरा भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये नेला जातो. कच-याचे वजन करताना ज्यादा वजन दर्शवून मनपाकडून पैसे उकळण्यासाठी त्या कच-यात माती मिश्रीत केली जात असल्याची तक्रार आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी होणे आवश्यक आहे. यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी संपूर्ण प्रकरणाचा सर्व बाजूंनी अभ्यास करून त्याची सविस्तर पडताळणी करून चौकशी करावी व चौकशीचा विस्तृत अहवाल येत्या १५ दिवसात सादर करावा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी आयुक्तांना दिले आहे.

Advertisement
Advertisement