Published On : Thu, Oct 26th, 2017

वांद्रे स्टेशनजवळील भीषण आग नियंत्रणात; अग्निशमन दलाचा जवान जखमी

Bandra Fire
मुंबई: वांद्रे स्टेशनच्या पूर्वकडील बेहरामपाड्यात (झोपडपट्टी) लागलेली भीषण आग नियंत्रणात आली आहे. आग विझवताना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला आहे. त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

महापालिकेकडून अतिक्रमनविरोधात कारवाई सुरु असतानाच ही भीषण आग लागली आहे. आग इतकी भीषण होती की, वांद्रे स्टेशनच्या तिकीट घरापर्यंत या आगीच्या झळा पोहोचल्या होत्या. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या आणि पाण्याचे 10 टॅंकरच्या मदतीने ही आग विझवण्यात जवानांना यश आले आहे. आग विझवण्यासाठी रेल्वे पोलिसांनीही अथक परिश्रम घेतले.

अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान सिलिंडरचा स्फोट
वांद्रे स्टेशन परिसरातील अवैध झोपडपट्टीवर अतिक्रमणविरोधी पथकाची कारवाई सुरु असताना सिलिंडरचा स्फोट झाला. त्यानंतर ही आग पसरल्याची प्राथमिक पाहिती मिळाली आहे.