Published On : Mon, Dec 18th, 2017

मुंबईत साकीनाक्याजवळ भीषण आग, 8 कामगारांचा मृत्यू


मुंबई: मुंबईतील साकीनाक्याजवळ भीषण आग लागली आहे. साकीनाक्याजवळील खैरानी रोडवर मिठाईच्या दुकानाला ही आग लागली. या आगीत होरपळून 8 कामगारांचा मृत्यू झाला.

आग लागल्यानंतर इमारतीचा काही भाग कोसळला आहे. त्यामुळे ढिगाऱ्याखाली आणि आगीत काही जण अडकल्याची माहिती मिळत आहे. आगीमुळे मिठाईच्या दुकानात जवळपास 15 कामगार अडकले आहेत. त्यापैकी 11 जणांना बाहेर काढलं आहे, तर अजूनही 4 जण अडकले आहेत.

आग आणि ढिगाऱ्याखाली अडकून जखमी झालेल्या 11 जणांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, 3 फायर इंजिन, 4 जम्बो टँकर आणि अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.