Published On : Fri, May 8th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड; फरार निदा खान अखेर पोलिसांच्या ताब्यात

Advertisement

नाशिक : टीसीएस कंपनीशी संबंधित कथित अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली. जवळपास २५ दिवसांपासून ती पोलिसांना चकवा देत होती.

नाशिक गुन्हे शाखेची विशेष पथके तिचा सातत्याने शोध घेत होती. तांत्रिक तपास, मोबाईलचे ठसे आणि गुप्त माहितीद्वारे अखेर पोलिसांनी तिचा ठावठिकाणा शोधून काढला. अटकेनंतर पुढील चौकशीसाठी तिला नाशिकमध्ये आणण्यात आले आहे.

तपासादरम्यान निदा खान छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव परिसरातील कैसर कॉलनीमध्ये राहत असल्याचे समोर आले. ती कुटुंबीयांसोबत एका सदनिकेत राहत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Gold Rate
June 24 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 43,600 /-
Gold 22 KT ₹ 1,33,300 /-
Silver/Kg ₹ 2,23,700/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अटक टाळण्यासाठी न्यायालयात अर्ज-

दरम्यान, अटक होऊ नये यासाठी निदा खानने आपण गर्भवती असल्याचा दावा करत अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने तो अर्ज नामंजूर केला.

Advertisement

या प्रकरणात पीडित महिलेला धार्मिक साहित्य पुरवणे, बुरखा देणे तसेच तिच्या भ्रमणध्वनीमध्ये धार्मिक ॲप्स स्थापित केल्याचे आरोप निदा खानवर आहेत. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, पीडितेची ओळख बदलून तिला मलेशियाला पाठवण्याची तयारी सुरू होती. त्यामुळे या प्रकरणामागे मोठे जाळे कार्यरत आहे का, याचा तपास आता अधिक वेगाने सुरू आहे.

याच प्रकरणातील दुसरा आरोपी दानिश शेख याच्या मोबाईलमधून काही महत्त्वाचे डिजिटल पुरावे मिळाल्याची माहिती आहे. संशयास्पद छायाचित्रे आणि व्हिडीओ तपास यंत्रणांच्या हाती लागले असून, त्यांचे विश्लेषण सुरू आहे.

🏆 BEST OF NAGPUR 2026
Which School Ranked #1?
Explore Rankings →

Advertisement
सिंधुदुर्ग में बारिश से किसानों को राहत #maharashtranews #barish #mansoon #kisan #latestnews

सिंधुदुर्ग में बारिश से किसानों को राहत #maharashtranews #barish #mansoon #kisan #latestnews

मराठी सम्मान को लेकर मनसे का प्रदर्शन #maharashtranews #mns #marathibhasha #andolan #news

मराठी सम्मान को लेकर मनसे का प्रदर्शन #maharashtranews #mns #marathibhasha #andolan #news

छह बागी सांसदों के खिलाफ अनोखा प्रदर्शन #maharashtranews #shivsena #politicsnews #jalnanews #news

छह बागी सांसदों के खिलाफ अनोखा प्रदर्शन #maharashtranews #shivsena #politicsnews #jalnanews #news

दीक्षाभूमि स्मारक समिति में बड़ा बदलाव #nagpurnews #dikshabhoomi #latestnews #news #maharashtra

दीक्षाभूमि स्मारक समिति में बड़ा बदलाव #nagpurnews #dikshabhoomi #latestnews #news #maharashtra

हाईकोर्ट ने अवैध इमारतों पर जताई नाराजगी.. #maharashtranews #latestnews #highcourt #avaidh

हाईकोर्ट ने अवैध इमारतों पर जताई नाराजगी.. #maharashtranews #latestnews #highcourt #avaidh

पहली बारिश से एपीएमसी बाजार प्रभावित #maharashtranews #barish #mumbai #latestnews

पहली बारिश से एपीएमसी बाजार प्रभावित #maharashtranews #barish #mumbai #latestnews

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges