नागपूर : शहरात अवैध धंदे चालवणाऱ्यांविरोधात नागपूर गुन्हे शाखेने अक्षरशः धडाकेबाज मोहीम उघडत पाच दिवसांत मोठी कारवाई केली आहे. दारू तस्कर, जुगार अड्डे चालक, ड्रग्ज तस्कर, वाहनचोर आणि बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्यांवर पोलिसांनी एकाच वेळी कारवाईचा बडगा उगारला. 6 ते 10 जूनदरम्यान करण्यात आलेल्या 31 कारवायांमध्ये तब्बल 3 कोटी 69 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 41 आरोपींना कायद्याच्या कचाट्यात आणण्यात आले आहे.
सर्वाधिक खळबळजनक कारवाई अंमली पदार्थ तस्करीविरोधात झाली. गुन्हे शाखेच्या पथकांनी 150 किलोहून अधिक गांजा आणि मेफेड्रोन (एमडी) जप्त करत ड्रग्ज माफियांच्या नेटवर्कलाच मोठा हादरा दिला. पारडी परिसरात राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत स्टील कॉईलच्या मालाखाली लपवून नेला जाणारा गांजाचा साठा पकडण्यात आला. या कारवाईतच जवळपास दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
याशिवाय, शहरातील जुगार आणि ऑनलाईन लॉटरीच्या अड्ड्यांवर धाडी टाकून संगणक, गेमिंग मशीन, मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. अवैध दारू विक्रेत्यांवरही कारवाई करत मोठ्या प्रमाणात दारूचा साठा हस्तगत करण्यात आला.
वाहन चोरीच्या गुन्ह्यांची उकल करत पोलिसांनी चोरीच्या दुचाकी आणि मोबाईल जप्त केले, तर बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्यांनाही अटक करण्यात आली. सीताबर्डीतील हुक्का पार्लरवर टाकलेल्या धाडीत 11 जणांवर कारवाई करून हुक्का साहित्य जप्त करण्यात आले.
गुन्हे शाखेच्या या धडक मोहिमेमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, शहरातील गुन्हेगारीविरोधात पोलिसांनी ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
PAPER LEAK के बाद... बच्चों को कैसे संभालें?
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
प्रफुल्ल गुडधे पाटिल : महत्वपूर्ण मुद्दों पर कांग्रेस की प्रेस कॉन्फ्रेंस #nagpurnews...
नागपुर में अवैध शराब फैक्ट्री पर क्राइम ब्रांच का छापा.. #nagpurnews #crime...
नागपुर: फिल्म का मुनाफा किसानों के बच्चों हेतु #nagpurnews #MaharashtraNews #PravinTarde #deoolband
धाराशिव: कर्जमाफी को लेकर कांग्रेस का प्रदर्शन #MaharashtraNews #LatestNews #Congress









