Published On : Wed, Jun 17th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर पोलिसांची मोठी कारवाई; बाप-लेक अटकेत, 25.5 लाखांची एमडी ड्रग्स जप्त

Advertisement

नागपूर : शहरातील अमली पदार्थांच्या अवैध तस्करीविरोधात नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बाप-लेकाला अटक केली आहे. या कारवाईत सुमारे 25 लाख 50 हजार रुपयांची एमडी (मेफेड्रोन) ड्रग्स जप्त करण्यात आली असून या प्रकरणातील आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे.

पोलिसांना सोनिया गांधी झोपडपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्स साठवून विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार कोतवाली पोलिसांनी छापा टाकत विजयसिंह राजपूत (वय 58) यांच्या घराची झडती घेतली. या कारवाईदरम्यान पोलिसांना 142 ग्रॅम एमडी ड्रग्स आढळून आली.

Gold Rate
June 17 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 50,600 /-
Gold 22 KT ₹ 1,39,800 /-
Silver/Kg ₹ 2,48,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तपासात विजयसिंह यांचा मुलगा अभिषेक राजपूत हा फॅब्रिकेशन व्यवसायाच्या आडून अमली पदार्थांचा व्यवसाय करत असल्याचे समोर आले. पोलिसांनी घटनास्थळावरून दोघांनाही ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान अभिषेकने ही एमडी ड्रग्स चुलत भाऊ अनिकेत राजपूत याच्या मदतीने मिळवल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी अनिकेतविरुद्ध शोधमोहीम सुरू केली असून तो सध्या फरार आहे.

Advertisement

जप्त करण्यात आलेल्या एमडी ड्रग्सची किंमत सुमारे 25.5 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अमली पदार्थांच्या या रॅकेटशी संबंधित इतर व्यक्तींचाही तपास सुरू आहे.

Advertisement
भांडेवाडी में 60 वर्षीय बुजुर्ग ने 4 साल की मासूम के साथ किया जघन्य कृत्य.. #nagpurnews #crime #news

भांडेवाडी में 60 वर्षीय बुजुर्ग ने 4 साल की मासूम के साथ...

NAGPUR TODAY  | TOP - 10 NEWS | 17 JUNE 2026 #news #newsupdate #top #maharashtranews #maharashtra

NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 17 JUNE 2026 #news...

बीएसएनएल केबल चोरी रैकेट का पर्दाफाश.. #nagpurnews #crime #latestnews #newsupdate

बीएसएनएल केबल चोरी रैकेट का पर्दाफाश.. #nagpurnews #crime #latestnews #newsupdate

आरटीआई में चौंकाने वाला खुलासा सामने आया.. #maharashtranews #latestnews #newsupdate

आरटीआई में चौंकाने वाला खुलासा सामने आया.. #maharashtranews #latestnews #newsupdate

42 डिग्री तापमान से जनजीवन प्रभावित ...#news #newsupdate #latestnews #vidarbha #maharashtranews

42 डिग्री तापमान से जनजीवन प्रभावित ...#news #newsupdate #latestnews #vidarbha #maharashtranews

MD ड्रग्स पर पुलिस का बड़ा एक्शन बाप-बेटा गिरफ्तार..#nagpurnews #crime #mddrugs #latestnews

MD ड्रग्स पर पुलिस का बड़ा एक्शन बाप-बेटा गिरफ्तार..#nagpurnews #crime #mddrugs #latestnews

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges