Published On : Thu, Jun 11th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर क्राइम ब्रँचची मोठी कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

Advertisement

नागपूर : शहरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत इमामवाडा परिसरातून एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जसह तिघांना अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या एनडीपीएस (नार्कोटिक्स) पथकाने ही कारवाई करत 13 ग्रॅम एमडी ड्रग्ज, मोबाईल फोन आणि दुचाकीसह एकूण 2 लाख 50 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील मुख्य पुरवठादार अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीदरम्यान सिरसपेठ येथील युनियन बँकेच्या मागील रस्त्यावर काही तरुण संशयास्पदरीत्या उभे असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन पंचांच्या उपस्थितीत संशयितांची झडती घेतली.

Gold Rate
June 10 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 48,200 /-
Gold 22 KT ₹ 1,37,600 /-
Silver/Kg ₹ 2,33,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

झडतीदरम्यान आरोपींकडून 13 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) पावडर, तीन मोबाईल फोन आणि एक पल्सर मोटारसायकल जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे अडीच लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख आरिफखा बब्बूखा पठाण (30, माटीपुरा, इमामवाडा), प्रांजल नरेंद्र गजभिये (21, सिरसपेठ) आणि कुणाल दिलीपराव जीभकाटे (28, सिरसपेठ) अशी झाली आहे. आरोपी आरिफखा पठाण याच्याविरुद्ध यापूर्वीही जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

प्राथमिक चौकशीत आरिफखा पठाण याने एमडी ड्रग्जचा साठा शहाबाज पठाण उर्फ अमु याच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली आहे. तसेच प्रांजल गजभिये आणि कुणाल जीभकाटे हे त्याच्याकडून अमली पदार्थ खरेदी करण्यासाठी घटनास्थळी आल्याचेही तपासात उघड झाले आहे. यानंतर पोलिसांनी शहाबाज पठाण उर्फ अमु याला फरार आरोपी घोषित करत त्याच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली आहेत.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(क), 22(ब) आणि 29 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ड्रग्ज नेटवर्कवर पोलिसांचा घाव-
शहरातील युवकांना अमली पदार्थांच्या विळख्यात अडकवणाऱ्या तस्करांविरोधात नागपूर पोलीस सातत्याने मोहीम राबवत आहेत. क्राइम ब्रँचच्या या कारवाईमुळे ड्रग्ज पुरवठा साखळीतील महत्त्वाच्या दुव्यांचा शोध लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फरार आरोपीच्या अटकेनंतर या रॅकेटमधील आणखी काही जणांची नावे समोर येऊ शकतात, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

नागपूर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शहरातील अमली पदार्थ तस्करांमध्ये खळबळ उडाली असून ड्रग्जविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे.

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

भेदोड़कर सदर थाना  सरकारी कार्यालय में लाखों की चोरी

भेदोड़कर सदर थाना सरकारी कार्यालय में लाखों की चोरी

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

एमपी बस स्टैंड पर खड़ी ट्रैवल्स बस में भीषण आग बड़ा हादसा टला

एमपी बस स्टैंड पर खड़ी ट्रैवल्स बस में भीषण आग बड़ा हादसा...

सोमैया के दौरे पर महानगरपालिका में हंगामा...

सोमैया के दौरे पर महानगरपालिका में हंगामा...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges