Published On : Fri, Jun 12th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात क्राइम ब्रांच युनिट-3 ची मोठी कारवाई; 3 चोर जेरबंद, 9 घरफोड्या आणि वाहनचोरीचे गुन्हे उघड

Advertisement

नागपूर : नागपूर पोलिसांच्या क्राइम ब्रांच युनिट-3 ने तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये तीन सराईत चोरांना अटक करत चोरी आणि वाहनचोरीच्या एकूण 9 गुन्ह्यांचा छडा लावला आहे. आरोपींकडून दुचाकी, सोने-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह तब्बल 4 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पहिल्या कारवाईत शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रेमनगर येथे राहणारे राकेश खिंची यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे 45 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. तपासादरम्यान पोलिसांनी बाबा बुद्धनगर येथील 19 वर्षीय निकेश लिंगायत याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने एका अल्पवयीन साथीदारासह चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या सांगण्यावरून पोलिसांनी चोरीचे मंगळसूत्र आणि तीन संगणक मॉनिटरसह 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दुसऱ्या कारवाईत हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयहिंद नगरी येथील मेघराज रोडगे यांच्या घरातील चोरीचा उलगडा करण्यात आला. आरोपीने घरातील रोख रक्कम आणि आवारात उभी असलेली कार चोरून नेली होती. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी नवाबपुरा येथील भूषण उर्फ ऑटो ठाकरे याला अटक केली. त्याच्याकडून सोने-चांदीचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 2 लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तिसऱ्या कारवाईत गुप्त माहितीच्या आधारे पाचपावली परिसरातील विक्की डेहरिया याला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने लकडगंज, न्यू कामठी, रामटेक, कन्हान, जरीपटका आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरी व वाहनचोरीचे अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून चोरीचे वाहन, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि रोख रकमेसह 1 लाख 1 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

Advertisement

क्राइम ब्रांच युनिट-3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल मोहंकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अटक आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी संबंधित पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.