Published On : Wed, Sep 4th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपूर विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई; 61 लाखांचे सोने जप्त,दोघांना अटक

चांदीच्या रंगाच्या तारेत लपवून आणले होते सोने
Advertisement

नागपूर : शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळावरूनकस्टम्सच्या एअर कस्टम्स यूनिट आणि एअर इंटेलिजन्स यूनिटच्या टीमने मोठी कारवाई करत 61 लाखांचे सोने जप्त केले आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित प्रवाशाची तपासणी केली असता 2 ट्रॉली बॅगमध्ये सोने चांदीच्या रंगाच्या जाड तारांच्या स्वरूपात लपवून ठेवलेले आढळून आले. वायरच्या स्वरूपात असलेल्या सोन्याला चांदीचा लेप दिला होता.

Today’s Rate
Saturday 05 Oct. 2024
Gold 24 KT 76,100/-
Gold 22 KT 70,800/-
Silver / Kg 93,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या कारवाईत 858.33ग्रॅम सोने पकडण्यात आले. या सोन्याची एकूण किंमत जवळपास 61,25,549 रूपये इतकी आहे. कतार एअरवेजने (फ्लाइट क्र. क्यूआर-590) दोहाहून नागपूरला जात असलेल्या दोन प्रवाशांकडून सोने जप्त केले आहे.या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून कस्टम विभागाने पुढील तपास सुरु केला आहे.

Advertisement